MMRDA : पायाभूत सुविधांसह शाश्वत विकासासाठी जागतिक बँकेचा बूस्टर

MMRDA
MMRDATendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांसह, वाहतूक आणि शाश्वत विकासासाठी एमएमआरडीए आणि जागतिक बँकेच्या शिष्टमंडळामध्ये नुकतीच महत्वपूर्ण बैठक पार पडली. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली जागतिकबँकेच्या शिष्ट मंडळासोबत झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशात विकासाभिमुख उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणीकरण्यासाठी जागतिक बँकेने सहयोग दर्शवला आहे.

MMRDA
Pune: पाहा मिळकतकरातील 40 टक्क्यांची सवलत कशी मिळवायची?

ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) हा एक शहरी नियोजन दृष्टीकोन आहे जो सार्वजनिक वाहतूक, सायकल ट्रक आणिपदपथांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे. वर्दळीच्या स्थानकांपासून थोड्या थोड्या अंतरावर वाहतूक सुविधा उभारणे आणि यातूनचकमी जागेत उत्तम सार्वजनिक सुविधांच्या उभारणीस नागरिकांस या सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. मास रॅपिड ट्रान्झिटसिस्टमसाठी विकासात्मक धोरणाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. हे धोरण मान्य होताच महानगरात पुनर्विकास आणिहरित क्षेत्र विकासाला चालना मिळेल. तसेच यातून एमएमआरडीएला पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी उभारण्यास ही मदत होईल.

MMRDA
बीकेसीत बुलेट ट्रेनच्या कामांना गती; अंतर्गत बांधकामांसाठी टेंडर

जागतिक बँकेच्या कौशल्याचा फायदा घेऊन आणि मेट्रो लाईन्स आणि ४००हून अधिक स्थानकांच्या उभारणीसह मेट्रोचे विस्तृत जाळेउभारण्याचा विचार करून हे सहकार्य मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजिनक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आहे. जागतिकबँकेसोबतची ही भागीदारी मुंबईतील महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देईल जसे की, पुनर्वसन, पुनर्विकास आणि स्थानकांभोवती परवडणारीसुलभ, सर्वसमावेशक घरे तयार करणे होय. तसेच, यातून पर्यावरचे रक्षण करण्यासाठीही प्रयत्नशील असल्याची माहितीएमएमआरडीएने दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com