EXCLUSIVE : ‘महिला व बाल विकास’चे ठेकेदारांच्या नावानं चांगभलं; मार्केटरेटपेक्षा दुप्पटीने खरेदी

20 कोटींची अनावश्यक खरेदी
Maharashtra
MaharashtraTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बहुतांश शासकीय विभागांनी विविध निर्णयांच्या माध्यमातून स्वतःसह ठेकेदारांचे कोटकल्याण केल्याचे दिसून येते. महिला व बाल विकास विभागाने पोषण अभियानाअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांना लाभार्थ्यांच्या वजन व उंचीची नोंद घेण्याकरिता एकूण एकोणचाळीस कोटी एकसष्ठ लाख रुपयांची खरेदी केली असून ही खरेदी बाजारदरापेक्षा दुप्पटीहून अधिक दरात करण्यात आली आहे. तसेच यामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची अनावश्यक खरेदी सुद्धा करण्यात आल्याचे दिसून येते. या खरेदीत मोठा गोलमाल कारभार झाल्याचे दिसून येते. नितीराज इंजिनिअर्स लि. आणि प्रिस्टीन कन्सेप्टस प्रा. लि. या दोन ठेकेदारांमार्फत ही अव्वाच्या सव्वा दरात खरेदी करण्यात आली आहे.

Maharashtra
Mumbai : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईकरांना काय दिली गुड न्यूज?

महिला व बाल विकास विभागाने ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी याबाबतीत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यात म्हटले आहे की, केंद्र शासनाने दि. ०१.०८.२०२२ रोजीच्या पत्रान्वये सक्षम अंगणवाडी व पोषण २.० राबविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. पोषण २.० मधील मार्गदर्शक सूचनांनुसार वृध्दी संनियंत्रण साधने खरेदी करण्यासाठी ८००० रुपये (सर्व करासहित) एवढी खर्च मर्यादा निर्धारित केलेली आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व स्पेसिफिकेशन विचारात घेऊन मंजूर दराच्या मर्यादेत ही साधने खरेदी करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुषंगाने आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांच्या वृध्दी संनियंत्रणाकरिता ही साधने पुरविण्यासाठी जीईएम (GeM) प्रणालीवर साहित्यनिहाय ४ टेंडर प्रकाशित केली होती. त्या अंतर्गत L१ आलेल्या पुरवठादारांकडून एकूण एकोणचाळीस कोटी एकसष्ठ लाख रुपये एवढ्या रक्कमेची वृध्दी संनियंत्रण साधने खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला होता.

Maharashtra
Mumbai : ठाणे-बोरीवली सुसाट! महायुती सरकारचा जाता जाता मोठा निर्णय

पोषण अभियानाअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांना लाभार्थ्यांच्या वजन व उंचीची नोंद घेण्याकरिता एकूण एकोणचाळीस कोटी एकसष्ठ लाख रुपये एवढ्या रक्कमेची ही साधने साहित्य खरेदी L१ ठेकेदारांमार्फत खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत नवजात बालकांची उंची मोजण्यासाठी यंत्र (Infantometer), लहान मुलांची उंची मोजण्यासाठीचे यंत्र (Stadiometer), वजनमापे यंत्र (Weighing Scale, Infant) व डिजिटल वजनमापे यंत्र (Digital Weighing Scale, Mother & child) या उपकरणांची तब्बल ४० कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. बाजारपेठेतील किंमतीपेक्षा तब्बल दुप्पट दर लावून ही खरेदी करण्यात आली आहे. मुळातच या उपकरणांची बाजारातील किंमत सुमारे २० कोटींच्या घरात आहे. लहान मुलांची उंची मोजण्यासाठी साडेदहा कोटींच्या यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे, मुळात अशा यंत्राची आवश्यकताच नाही, तसेच नवजात बालकांसाठी आणि महिला व मुलांचे वजन मोजण्यासाठी दोन स्वतंत्र यंत्र खरेदी करण्यात आली आहे. एकाच यंत्रात जे काम होते त्यापोटी तब्बल साडेनऊ कोटी रुपये अनावश्यक खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच ४० कोटी रुपयांच्या खरेदी व्यवहारात २० कोटींची अनावश्यक खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीत कोट्यवधींचा गोलमाल झाल्याचे दिसून येते.

Maharashtra
Mumbai : MMR मध्ये गिरणी कामगारांना 81 हजार घरे; ‘त्या’ दोन कंपन्यांना काम

१- अं.क्र. साहित्याचे नांव

२- L१ पुरवठादाराचे नांव

३- खरेदीची एकूण संख्या

४- प्रति नग रुपये (सर्व करासहित)

५- एकूण रक्कम (सर्व करासहित)

१. Infantometer

नितीराज इंजिनिअर्स लि.

४३८६९

१६०९ रुपये

७,०५,८५,२२१ रुपये


2. Stadiometer

प्रिस्टीन कन्सेप्टस प्रा. लि.

४८३७४

२१६४ रुपये

१०,४६,८१,३३६ रुपये

3. Weighing Scale (Infant)

नितीराज इंजिनिअर्स लि.

६९५०९

१३६५ रुपये

९,४८,७९,७८५ रुपये

4.Digital Weighing Scale (Mother & child)

नितीराज इंजिनिअर्स लि.

४७८५४

२६३३

७,७७१ रुपये

१२,५९,९९,५८२ रुपये

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com