'कोणाच्या हट्टासाठी' मुंबईकरांच्या ३५०० कोटींचा चुराडा?

Aditya Thackeray
Aditya Thackeray Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईत समुद्राचे खारे पाणी गोड करण्यासाठीचा प्रकल्प हा मुंबईकरांच्या ३५०० कोटींचा चुराडा करणारा आहे. मुंबई महापालिकेने (Bruhanmumbai Municipal Corporation) कोणतीही रीतसर प्रक्रिया पार न पाडता हा प्रकल्प राबवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (आप Aam Adami Party) केला आहे. त्यापेक्षा मुंबईच्या पाणी पुरवठ्यात होणारी ८०० एमएलडी इतकी गळती आणि चोरी रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी मागणी 'आप'च्या मुंबईच्या अध्यक्षा प्रीती मेनन यांनी केली.

Aditya Thackeray
महाविकास आघाडीकडून दरवर्षी राजभवनावर 'एवढा' खर्च?

मुंबई महापालिकेकडून मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प हा मुंबईकरांना नको आहे. मुंबईच्या पाण्याच्या गरजेवर हा उपाय नव्हे असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांना गरजेचे असलेल्या पाण्याच्या गरजेच्या तुलनेतही हा प्रकल्प पाणी पुरवठा करू शकत नसल्याचे मेनन यांनी स्पष्ट केले.

Aditya Thackeray
अखेर औरंगाबादकरांना कळणार एका क्लिकवर पाण्याची वेळ

मुंबईला सध्या ४०० एमएलडी पाण्याची गरज आहे. पण २०० एमएलडीच्या या डिसॅलिनेशन म्हणजे खारे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाने मुंबईची पाण्याची गरज भागणार नाही. म्हणूनच हा खर्चिक प्रकल्प रद्द केला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी १६०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तर प्रकल्प चालवण्यासाठी १९०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रकल्प चालवण्यासाठी ३३ मेगा वॅट क्षमतेचा वीज प्रकल्पही उभारावा लागणार आहे. त्यामुळे अवघ्या २० वर्षांसाठीच्या कालावधीचा प्रकल्प हा मुंबईकरांवर लादू नये, अशी मागणी 'आप'कडून करण्यात आली आहे.

Aditya Thackeray
Mumbai: वीज पुरवठ्याबाबत मोठा निर्णय; 'या' बलाढ्य कंपनीला...

या प्रकल्पासाठी भर समुद्रातून ४ ते ५ किलोमीटर अंतरावरून पाणी घेण्यात येईल. त्यामुळेच मच्छीमार बांधवांचे मासेमारीचे क्षेत्रही बाधित होईल. केवळ आदित्य ठाकरेंचा हट्ट पुरवण्यासाठी हा प्रकल्प राबवू नये अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने कोणताही सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला नाही. तसेच अवघ्या दोन आठवड्यात या प्रकल्पाला मंजूरी मिळून सामंजस्य करारही झाल्याचे 'आप'ने निदर्शनास आणून दिले. प्रकल्पाची मागणी नसताना फक्त इस्रायलच्या कंपनीने हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव ठेवला म्हणून प्रकल्पाला मंजूरी दिल्याचे मेनन यांनी सांगितले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या हट्टासाठी मुंबईकरांच्या मेहनतीच्या पैशांचा चुराडा करू नये, अशीही मागणी त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com