शिंदे गटातील 'या' 3 नेत्यांना का हवेय 'जलसंधारण'चे मंत्रिपद?

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारमध्ये मृद व जलसंधारण खात्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या मराठवाड्यातील तिघा नेत्यांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यापैकी एकजण गेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, दुसरे राज्यमंत्री होते; तर तिसरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Shinde) यांच्या सरकारमध्ये शेवटच्या टप्प्यात काहीकाळ कॅबिनेट मंत्री होते. हे खाते आपल्यालाच मिळावे यासाठी या तिघाही नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे.

राज्याच्या मृद व जलसंधारण विभागासाठी (Department Of Soil And Water Conservation) अधिकाऱ्यांचा जसा आग्रह असतो, तसाच तो हे खाते मिळावे यासाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांची संख्याही नेहमीच मोठी असते. जलसंधारणाच्या प्रकल्पांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी येतो. या निधीवर अनेक कंत्राटदारांचा डोळा असतो. या विभागातील प्रकल्पांचे कंत्राट मिळविण्यासाठी काहीही करण्याची तयारी या कंत्राटदारांची असते. मोठा 'मलिदा' असलेल्या या खात्याचे आकर्षण जसे कंत्राटदारांना असते, तसेच ते नेत्यांनाही असते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
नागपूर, चंद्रपुरात मोठी कोळसा चोरी; कोणी लांबविला 578 मेट्रिक टन..

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी बंड करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार घालवले. त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सेनेच्या व अपक्षांच्या मदतीने राज्यात सत्तांतर झाले. सुरवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा शपथविधी झाला. या घटनेला आता महिना उलटला आहे. तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गेले काही दिवस शांत असलेल्या दोन्हीकडील आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
तगादा : उड्डाण पुलावरील तुटलेल्या केबल वायर कोण हटवणार?

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या गटाला किती आणि कोणती खाती मिळणार याबाबत अजूनही संदिग्धता आहे. मात्र, भाजपकडून काही जास्तीची खाती देऊन शिंदे गटाचा सन्मान राखला जाईल असे समजते. शिंदे गटातील 18 ते 19 जणांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. तर उर्वरित जवळपास 23 ते 24 जण भाजपकडून मंत्रिमंडळात राहतील असा अंदाज आहे. येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी दाट शक्यता आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
ठेकेदार बदलला अन् कचरा साठू लागला; चर्चा ठेकेदाराचीच...

शिंदे गट आशावादी

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये मृद व जलसंधारण खाते शिवसेनेकडे होते. शिवसेनेसोबत असलेले शंकरराव गडाख या खात्याचे मंत्री होते. नव्या सरकारमध्येही हे खाते शिंदे गटाकडे राहील असा अंदाज आहे. त्यासाठी सध्या शिंदे गटाच्या मराठवाड्यातील तीन नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यापैकी एकजण गेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, दुसरे राज्यमंत्री होते. तर तिसरे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेवटच्या टप्प्यात काहीकाळ कॅबिनेट मंत्री होते. या तिघांपैकी कॅबिनेट मंत्री राहिलेल्या दोघांपैकी एकाला हे खाते मिळेल अशी चर्चा आहे. मात्र, सध्यातरी या तिघाही नेत्यांनी मृद व जलसंधारण खात्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
जलसंधारणमध्ये बदल्यांचे गँगवॉर; थेट उच्चपदस्थांच्या खुर्चीलाच हात?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मृद व जलसंधारण खात्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. विशेषतः महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळ भ्रष्टाचाराने बरबटले आहे. या खात्यात जलसंधारणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांचे फार मोठे लॉबिंग चालते. इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असूनही हे खाते तसे फारसे कुणाच्या नजरेत येत नाही. हेच प्रमुख कारण आहे की या खात्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com