पुणेकरांचे कंबरडे मोडणारे 'ते' ठेकेदार कोण?

Potholes
PotholesTendernama
Published on

पुणे (Pune) : दोष दायित्व कालावधीत (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड - DLP) संपण्यापूर्वीच रस्त्यांना खड्डे पडल्याने महापालिकेने (Pune Municipal Corporation) ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी सहा रस्त्यांना खड्डे पडल्याने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, पण कोणत्या ठेकेदाराला किती रुपयांचा दंड लावला, याची माहिती मात्र गुलदस्तात ठेवली आहे.

Potholes
पोषण आहारासाठी ठेकेदार मिळेना; सेंट्रल किचनच्या टेंडरमध्ये राजकारण

शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेवर टीकेची झोड उठत आहे. सध्या वेगाने रस्तेदुरुस्ती केली जात असली तरी अवघ्या काही महिन्यांपूर्वी कामे केलेल्या रस्त्यांना खड्डे पडल्याने निकृष्ट कामाचा दर्जाही समोर आला. त्यामुळे महापालिकेने हे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

Potholes
खासदार तुमाने यांनी 25 कोटींचा निधी कुठे खर्च केला?

गेल्या तीन वर्षात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची माहिती काढण्यात आली. त्यामध्ये १३९ रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची पाहणी करून खड्डे पडल्याने तेथे ठेकेदाराला प्रतिखड्डा पाच हजार रुपये दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून ठेकेदारांवर दंड आकारण्यास सुरवात झाली आहे.

Potholes
औरंगाबादकर खूश! जल बेल ॲपला का मिळतोय भरभरून प्रतिसाद?

धायरी येथील श्री कंट्रोल चौक ते काळूबाई मंदिराकडे जाणारा रस्ता आणि कात्रज येथील नॅन्सी लेकटाऊन परिसर ते पद्मजा पार्क सोसायटी या दरम्यानच्या रस्त्याला खड्डे पडल्याने ठेकेदाराकडून १ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पर्वती पायथा येथे गजानन महाराज मंदिर लक्ष्मीनगर येथील रस्त्याला खड्डा पडल्याने २५ हजार दंड लावला. महंमदवाडी रस्‍ता महापालिका शाळा येथील काम करणाऱ्या ठेकेदाराला २ लाख ३० हजार दंड लावला आहे, तर शिवाजीनगर भागातील हरेकृष्ण पथ रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला आणि सूस-म्हाळुंगे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला प्रत्येकी ७५ हजार आणि ४० हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.

Potholes
'या' निर्णयामुळे तरी सुटणार का कात्रज-कोंढवा रुंदीकरणाचा प्रश्न?

निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार कोण, याची माहिती पथ विभागाकडून उपलब्ध झाली नाही. रस्त्यांची चाळण होऊन पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली, पण ठेकेदारांची पोलखोल होऊ नये म्हणून त्यांची नावे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही समोर आले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी ठेकेदारांची नावे जाहीर करण्याचे आदेश पथ विभागाला दिले जातील असे सांगितले.

Potholes
पुणे महापालिकेचा सुपर निर्णय; आता ठेकेदारांना एका खड्ड्याला ५ हजार

दिवसभरात दीडशे खड्डे बुजविले
आज दिवसभरात महापालिकेने १२ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावरील १५४ खड्डे बुजविले. त्यामध्ये पुनावाला ग्रुपकडून २६ खड्डे बुजविण्यात आले आहेत, तर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे येरवडा येथील हॉटमिक्स प्लांट बंद असल्याने येथून खड्डे बुजविण्यासाठी माल उपलब्ध झालेला नाही, असे पथ विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com