Western Freeway : मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी बीएमसीचा 'असा' आहे प्लॅन?

Western Freeway
Western FreewayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर (Western Freeway) नियमित होणारी वाहतूककोंडी (Traffic Jam) फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) भूमिगत आणि एलिव्हेटेड मार्ग तयार करणार आहे. या 'प्रवेश नियंत्रण' रस्ते कामात पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी होणाऱ्या वळणांवर एक भूमिगत आणि एक उन्नत मार्ग असेल. यामध्ये दोन रस्ते सांताक्रुझ, विलेपार्ले भागात तर बोरिवली आणि बीकेसी ते दक्षिण मुंबईच्या दिशेने बनवण्यात येणार आहेत. यासाठी महापालिका 800 कोटींचा खर्च करणार आहे.

Western Freeway
Sambhajinagar : 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 'तो' रस्ता होणार वाहतुकीसाठी मोकळा

मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग हे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत; मात्र या दोन्ही मार्गांवर सकाळी शहराच्या दिशेने येताना आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर उपनगराच्या दिशेने जाताना एक तासाच्या प्रवासासाठी काही वेळा दोन ते तीन तासांपर्यंत वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून 'प्रवेश नियंत्रण' रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील चार प्रमुख जंक्शन्सवर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी दोन स्तरांवर काम करण्यात येणार आहे.

मिलन सबवे ते वांद्रेपर्यंत उजवीकडे आणि अंधेरी ते मिलन सबवे मार्गाने डावीकडची वाहतूक सुलभ करण्यासाठी दोन्ही सर्व्हिस रोडला जोडणारे 25 मीटर बाय 4 मीटरच्या अंतर्गत आकाराच्या सहामार्गिकांवरून दुतर्फा वाहने जातील अशी व्यवस्था करण्यात येईल.

Western Freeway
Sambhajinagar : चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या 'या' ऐतिहासिक वास्तुंचे रूपडे पालटणार

पश्चिम द्रुतगती मार्गावरील सुधीर फडके उड्डाणपूल, बोरिवलीला पश्चिम द्रुतगती महामार्गावर थेट प्रवेश नाही. त्यामुळे नॅशनल पार्क जंक्शन आणि ओवरीपाडा मेट्रो स्टेशन जंक्शन येथे वाहतूककोंडी होते. महामार्गावर थेट प्रवेश मिळाल्यास या भागातील वाहतूककोंडी कमी होईल.

हनुमान रोडवरून वांद्रेच्या दिशेने प्रवास करण्यासाठी सध्याच्या पादचारी आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी 6 मीटर बाय 2.5 मीटरचा अंतर्गत आकाराचा पादचारी भूमिगत मार्ग तयार करण्यात येणार आहे.

बीकेसीला जोडणाऱ्या मार्गापासून (कनेक्टर) दक्षिण मुंबईकडे संपर्क मार्ग नाही. परिणामी पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यावर उपाय म्हणून बीकेसी कनेक्टरपासून दक्षिण मुंबईला जाण्यासाठी एक यू-पद्धतीचा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com