Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या संगनमताने 7 हजार कोटींचा घोटाळा

Thane Scam : कल्याणमध्ये ६३ एकर जमीन बिल्डरच्या घशात; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हाल्लाबोल
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarTendernama
Published on

Mumbai News मुंबई : ठाणे (Thane) जिल्ह्यात कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ येथे रिजन्सी निर्माण लिमिटेड गृहनिर्माण कंपनीने शासकीय जमीन अनाधिकृतपणे बिगरशेती केली. म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला हाताशी धरून, गरीब व गरजवंत शेतकऱ्‍यांची फसवणूक करून, सुमारे सात हजार कोटी रुपयांचा सुनियोजित घोटाळा (Scam) जिल्हाधिकारी, ठाणे व महसूल विभागातील अधिकारी यांच्या संगनमताने केला आहे.

त्यामुळे या प्रकरणाची एक महिन्याच्या आत चौकशी करावी व म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला दिलेली ६३ एकर जमीन महसूल विभागाने ताब्यात घ्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar
Atul Save : SRA प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांवर सरकारचा कारवाईचा बडगा; काय म्हणाले मंत्री?

विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने सभागृहाचे या विषयाकडे लक्ष वेधले. वडेट्टीवार म्हणाले, म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेने २००८ रोजी केवळ १२ दिवसातच हा भूखंड महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अटी व शर्तीचा भंग करून मे. रिजन्सी निर्माण लिमिटेड, गृहनिर्माण कंपनी यांना फक्त चार कोटी रुपयांमध्ये विकला. शासनास देय रक्कम रुपये १ कोटी ६८ लाख ९३ हजार १४० मे. रिजन्सी निर्माण लिमिटेड गृहनिर्माण कंपनी यांनी त्यांच्या सारस्वत बँक खात्यातून जमा केलेली आहे.

Vijay Wadettiwar
Sambhajinagar : आमदार पावले! सातारा-देवळाई रस्त्यासाठी मिळाला कंत्राटदार

याचाच अर्थ शासनाची जमीन सुनियोजित मार्गाने म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला समोर करून मे. रिजन्सी निर्माण लिमिटेड गृहनिर्माण यांनी बळकावली आहे. रिजन्सी निर्माण लिमिटेड आणि अधिकाऱ्यांनी १२ दिवसात करारनामा करून, जमिनीचे व्हॅल्यूएशन कमी दाखवून फक्त साडे चार कोटी रुपयात जमीन बिल्डरच्या घशात घातली आणि सात हजार कोटींचा घोटाळा केला. यातून ३० हजार कोटी रुपये बिल्डर कमावणार आहे.

Vijay Wadettiwar
Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील 'या' रस्त्यांसाठी साडे नऊ कोटींचा निधी

या प्रकरणाची महसूल मंत्र्यांकडे सुनावणी झाली. त्यात एक सदस्यीय समिती नेमू आणि चौकशी करू असे महसूल मंत्र्यानी सांगितले. मात्र तीन महिने उलटून गेले आहेत तरी अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकणाची महसूल मंत्र्याच्या आदेशानुसार एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करण्यात यावी.

तसेच अटी आणि शर्तीचा भंग झाल्यामुळे जमीन परत महसूल विभागाकडे जमा करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. शासनाने वडेट्टीवार यांच्या या मागणीची नोंद घेऊन उचित कारवाई करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com