औरंगाबाद (Aurangabad) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) मुंबई ते नागपूरपर्यंत कारने प्रवास करताना संपूर्ण मार्गावर वाहनचालकाला १ हजार २१३ रुपये टोलसाठी मोजावे लागणार म्हणजे कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या वाहनांसाठी प्रत्येक किलोमीटर पावणे दोन रुपये टोल वसूल केला जाणार आहे. या मार्गाच्या टोल वसूलीसाठी टेंडर काढले आहे. त्यात वेगवेगळ्या २६ ठिकाणी टोलनाके उभारले जाणार आहेत. दुसरीकडे या मार्गावरच्या टेंडरसाठी कोण्या कंपन्यांत स्पर्धा होणार आणि वसुलीचे टेंडर कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे.
मुंबई ते नागपूर हा ७०१.४८० किलोमीटर रस्ता आहे. या रस्त्यावर २६ टोल नाक्यांवर तुम्हाला टोल भरावा लागणार आहे. यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून. टेंडर दाखल करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२२ देण्यात आलेली आहे. या रस्त्यावर २६ टोल नाक्यांवर २ हजार ६२४ कर्मचारी असतील.
लहान वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोलचा खर्च
समृद्धी महामार्गावर कार, जीप, व्हॅन किंवा हलकी मोटार वाहने यांच्यासाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये प्रमाणे टोल द्यावा लागेल. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने किंवा मिनी बस यांना २.७९ रुपये खर्च येईल. बस अथवा ट्रक (दोन आसांची) यांच्यासाठी ५.८५, तीन आसांची व्यावसायिक वाहने यांच्यासाठी ६.३८ रुपये, अवजड बांधकाम यंत्रसामग्री (एचसीएम) किंवा अनेक आसांची वाहने (एमएव्ही-चार किंवा सहा आसांची) ९.१८ तर अतिजड वाहनांसाठी (सात किंवा जास्त आसांच्या वाहनांसाठी ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर टोल द्यावा लागेल.
२६ प्रकारच्या व्यक्तींच्या वाहनांना राहणार सूट
समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीन चाकी, सहा आसनी ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर यांना मनाई राहणार आहे. तसेच या मार्गावर २६ प्रकारच्या व्यक्तींच्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. यात देशातील महत्त्वाची पदे सोबत न्यायाधीश, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, लोकसभा-राज्यसभा खासदार, विधानसभा-विधानपरिषद सदस्य, राज्याचे मंत्री, राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर, लष्कराची वाहने, केंद्र आणि राज्य सशस्त्र सेना दलाच्या निमलष्करी दलासह आणि पोलिस विभागाची वाहने, पोस्ट विभागाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका-शववाहिका यांना समावेश आहे.
या महामार्गात येणारे मुख्य जिल्हे
नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून जातो. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या १४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. असे या महामार्गाशी महाराष्ट्रातील एकूण चोवीस जिल्हे जोडले जाणार आहेत. तसेच २६ तालुके आणि ३९२ गावांमधून हा मार्ग जातो. या महामार्गावर वाहनांची गती मर्यादा १५० किलोमीटर आहे. १६ कंत्राटदारांकडून या रस्त्याचे पॅकेजनुसार काम करून घेतले जात आहे.
असे असतील २६ टोल नाके
महामार्ग पॅकेज क्रमांक........किलोमीटर...............ठिकाण
सीपी-१ .......................१०.४७५...............वायफळ
सीपी-१......................२९.६०.................सेलहोड वडगाव बक्षी (सिंधी ड्रायपोर्ट)
सीपी-२......................५७.८०..................येळाकोळी ((वर्धा)
सीपी-२......................८४.११.................विरुल (आर्वी पुळगाव)
सीपी-३.....................१०५.०.................धामणगाव (आसेगाव)
सीपी-३.....................१३८.४०...............गावनेर तळेगाव (शिवनी) (यवतमाळ अमरावती)
सीपी-४....................१८२.४०...............कारंजा लाड
सीपी-४.....................२१०.६०...............शेलू बाजार-वनोजा
सीपी-५.....................२३८.०................मालेगाव (मालेगाव-जहांगीर)
सीपी-६....................२८४.०................मेहकर
सीपी-७....................३१६.६९७..............दुसरबीड
सीपी-७....................३३९.८१४.............सिंदखेडराजा
सीपी-८ ...................३७०.३३४...............निधोना (जालना)
सीपी-९ ...................४२२.७००.............सावंगी (औरंगाबाद)
सीपी-१०...................४४७...................माळीवाडा (औरंगाबाद)
सीपी-१०..................४७०.७०.............हडस पिंपळगाव (लासूर)
सीपी-१०.................४८८.३००.............घायगाव जांबरगाव
सीपी-११.................५०५.२२४.............धोत्रे
सीपी-११.................५२०....................कोकमठाण (शिर्डी)
सीपी-१२.................५६४.७१०.............गोंदे (सिन्नर)
सीपी-१३..................६००.१३०............भारवीर (नाशिक)
सीपी-१४..................६२५..................पिंप्री सद्रुधीन (इगतपुरी)
सीपी-१४..................६३५.३००.............फुगळे
सीपी-१६....................६७४.२००............खुटघर-सापगाव
सीपी-१६....................६७८.०................हिवरस
सीपी-१६...................६९६.८००..............निंबवली
वाहनांसाठी टोलचा प्रतिकिलोमीटर येणार खर्च
वाहनांचा प्रकार........................................प्रतिकिलोमीटरसाठी टोल (३१ मार्च २०२५ पर्यंत)
१) कार, जीप, व्हॅन किंवा हलकी वाहने..................१.७३ रुपये
२) माल वाहतुकीची वाहने किंवा मिनी बस.....................२.७९
३) ट्रक, बस (दोन आसांची)......................................५.८५
४) ३ आसांची व्यावसायिक वाहने...................................६.३८
५) अवजड बांधकाम यंत्रसामग्री (एचसीएम)
अनेक आसांची वाहने (चार किंवा सहा आसांची)..................९.१८
६) अति अवजड वाहने (७ किंवा जास्त आसांची)................११.१७