देशातील सर्वांत मोठ्या सागरी सेतूचे स्वप्न लवकरच येणार प्रत्यक्षात

Mumbai Trans Harbour Link
Mumbai Trans Harbour LinkTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू (Longest Sea Bridge In India) आलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour link) प्रकल्पाचे काम पॅकेज १, २ व ३ अशा तीन भागांमध्ये प्रगतिपथावर आहे. सद्यस्थितीत तिन्ही पॅकेज मिळून ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे; तर संपूर्ण काम सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याचे नियोजित आहे. या प्रकल्पाच्या डेक स्लॅबपर्यंतचे काम पूर्ण झाल्याने बांधकाम साहित्याची वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. परिणामी प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढणार आहे.

Mumbai Trans Harbour Link
मुंबई एअरपोर्टच्या धर्तीवर 950 कोटींतून साकारणार 19 रेल्वे स्टेशन

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मुंबई पारबंदर प्रकल्प भाग-१ची शिवडी येथे पाहणी केली. शिवडी येथील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या ६ आंतरबदलांपैकी सी-२ रॅम्पचे काम सबबेसपर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच, रॅम्पपासून मूळ पुलाच्या ४ किलोमीटर अंतराच्या गाळाचे डेक स्लॅबपर्यंत काम पूर्ण झाले आहे.

Mumbai Trans Harbour Link
मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या काही मिनिटांत करा पार..

काम पूर्ण झाल्यामुळे कंत्राटदाराला त्याच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करणे सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पुढील बांधकामाचा वेग वाढणार आहे. यापूर्वी पुलाच्या कामाकरिता व पाहणीकरिता तात्पुरत्या स्वरूपाच्या पुलाचा व लिफ्टचा वापर करण्यात येत होता. सध्या मुंबईच्या रस्त्यावरून मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या मुख्य पुलावरून वाहनाने जाणे शक्य असल्यामुळे हा एक मैलाचा दगड आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

Mumbai Trans Harbour Link
रायगडचा विकास आता सुस्साट...१० हजार कोटींची 'ही' कामे प्रगतीपथावर

...असा आहे मार्ग

- एमएमआरडीएतर्फे एकूण २१.८ किलोमीटर लांबीच्या, सहा लेनच्या या समुद्री मार्गाचे बांधकाम सुरू आहे. यात १६.५ किलोमीटरचा समुद्रातून जाणारा मार्ग आणि उर्वरित ५.३ किलोमीटरचा रस्ता आहे. यातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडले जाणार आहे.

- ट्रान्स हार्बर लिंक मार्ग प्रत्यक्षात आल्यास मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता आहे. हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग ४-बी वरील चिरले येथे जोडला जाईल. यावरून दररोज सुमारे ७० हजार वाहनांची ये-जा होण्याचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com