Thane Tender News : ठाणे महापालिकेच्या 'त्या' टेंडरकडे ठेकेदारांनी का फिरवली पाठ?

Thane
Thane Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) हद्दीतील बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास (PM Awas) योजनेंतर्गत 'परवडणारी घरे' योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी बेतवडे येथे दोन शासकीय भूखंडांवर प्रकल्प उभारण्यासाठी पीपीपी (PPP) तत्त्वावर टेंडर (Tender) प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र दोनदा मुदतवाढ देऊनही या टेंडरकडे ठेकेदारांनी (Contractors) पाठ फिरवली आहे.

Thane
Nashik DPC : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी चांगली बातमी; तब्बल 1262 कोटींचा निधी...

बेतवडे येथे सरकारकडून प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडांवर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतर्गत येणारे सुमारे १,४४१ लाभार्थी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आहेत. त्यापैकी १,२५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. उर्वरित १८८ प्रकल्पबाधितांना रुपये दोन लाख इतका आर्थिक हिस्सा अदा करून सदनिका देय राहतील.

या सदनिका ३० चौ. मी. चटईक्षेत्र इतक्या मोजमापाच्या असतील. या कामाचे टेंडर पीपीपी तत्त्वावर काढण्यात येणार आहे. जो ठेकेदार १,४४१ सदनिकांपेक्षा अधिक सदनिका (पाच वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसह) स्वखर्चाने महापालिकेला बांधून देईल, अशा विकसकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार आता या कामाचे टेंडर पीपीपी तत्त्वावर काढण्यात आले आहे; परंतु टेंडरला दोनदा मुदतवाढ देऊनही प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Thane
MGNREGA : राज्यात वैयक्तिक लाभाच्या योजनांचे 671 कोटी चार महिन्यांपासून थकले

तसेच या प्रकल्पाकरिता येणारा विकसन खर्च ३६.८५ कोटी महापालिकेला डेव्हलपमेंट चार्ज म्हणून द्यावे लागणार आहेत. भूखंडनिहाय एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के क्षेत्रफळ हे ओपन स्पेसेस रोड्स, आरजीसाठी राखून ठेवून उर्वरित ९० टक्के क्षेत्रफळापैकी सुमारे ४८.३० टक्के क्षेत्रफळावर एएचपी घरे, एमआयजी घरे-व्यावसायिक गाळे, आरक्षित करण्याचे प्रस्तावित आहे.

दरम्यान, विकसकाने सव्वा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे यापूर्वी काम केले असावे, अशी एक महत्त्वाची अट यात असल्याने त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. दुसरीकडे बेतवडे हे दिव्याच्याही पुढे असून त्याठिकाणी अद्यापही फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे विकसकदेखील या कामासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता टेंडरच्या अटी, शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com