बीकेसीत बुलेट ट्रेनच्या कामांना गती; अंतर्गत बांधकामांसाठी टेंडर

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसी स्टेशनच्या बांधकामाला गती आली आहे. सध्या बीकेसीवरील स्टेशनच्या सिव्हिल, हॉर्टिकल्चर, इलेक्ट्रिकल, एसअँडटी, एमईपी यासह इमारतींच्या विविध अंतर्गत बांधकामांसाठी टेंडर मागवण्यात आली आहेत.

Bullet Train
Eknath Shinde : नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता; 25000 कोटींची..

मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सूरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा 2026 पर्यंत सुरु केला जाणार आहे. हायस्पीड असा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प असणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसीवर बुलेट ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या खासगी कंपन्यांना भागीदारीत हे काम दिले आहे. मुंबई बीकेसी ते साबरमती या दरम्यान एकमेव अंडरग्राउंड स्टेशन असणार आहे. हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनी आणि मॅसर्स एमईआयएल या दोन कंपन्या हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्टेशनची निर्मिती करतील. आतापर्यंत मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाद्वारे 61.3 किमी, वडोदराजवळील 12.6 किमी मार्गाचे पूर्ण झाले आहे. सतत मार्ग आणि इतर ठिकाणी 48.7 किमीचे बांधकाम समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2022 ते मे 2023 पर्यंत 50 किलोमीटरच्या मार्गिका बांधण्यात आल्या आहेत.

Bullet Train
Mumbai-Goa Highway डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार;दोन पुलांसाठी 68 कोटी

बीकेसीवरील स्टेशनच्या सिव्हिल, हॉर्टिकल्चर, इलेक्ट्रिकल, एसअँडटी, एमईपी यासह इमारतींच्या अंतर्गत बांधकामांसाठी टेंडर मागवण्यात येणार आहेत. टेंडर भरण्यासाठी 19 जून 2023 मुदत दिली आहे. तर कटिंग साहित्यासाठी टेंडर काढण्यात आले असून त्यासाठी 7 जून अंतिम मुदत असणार आहे. तसेच डिझाईनचे कोरीवकाम, एकरकमी किंमतीच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यासाठी डिझाईन, निर्मिती, पुरवठा आणि चाचणी आणि कमिशनिंगची मुदत 30 ऑगस्ट 2023 पर्यंत राखीव देण्यात आली आहे.

Bullet Train
Mumbai : 2 हजार कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला नव्या जागेची प्रतीक्षा

बीकेसीवर उभारण्यात येणाऱ्या स्टेशनची एकूण उंची 60 मीटर इतकी असून, 24 मीटर जमिनीखालून बुलेट ट्रेन धावणार आहे. बीकेसी स्टेशनच्या प्रवेशद्वारावर अरबी समुद्राचे चित्रण रेखाटली जाणार आहे. आकाश, ढग आणि उसळणाऱ्या लाटांचे फोटो या थीम मध्ये असतील. तळमजला अधिक चार मजल्याची स्टेशनची इमारत असेल. तळ मजल्यावर प्रवेश, सुरक्षा रक्षक, तपासणीसाठी स्कॅनिंग मशीन लावण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर काही साहित्यासाठी राखीव खोल्या असतील. दुसऱ्या मजल्यावर बिजनेस तिकिट ऑफिस, क्लास लाउंज, कस्टमर केअर कमर्शिअल शॉप असेल. तर शेवटच्या फ्लोअरवर स्टेशन परिसर, प्लॅटफॉर्म आणि सर्विस रुम बांधण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com