तेल उत्खनन उपकरणांचा निर्मिती प्रकल्प 'इथे' होणार

मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची आंतराष्ट्रीय झेप
Megha Engineering

Megha Engineering

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : आपण कायम परदेशी कंपन्या यशस्वी ठरलेल्या भारतीय कंपन्यांना चांगले पैसै मोजून विकत घेताना पाहिले असेल, मात्र यावेळी एका भारतीय कंपनीने इटलीची कंपनी विकत घेतली, तीही तेल उत्खन्नन उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रातील बलाढ्य कंपनी. ६० देशांना अत्याधुनिक उपकरणं पुरवणाऱ्या इटलीच्या ड्रिलमेक एसपीए या कंपनीला तेलंगणाच्या मेघा इंजिनीअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लि. (MEIL) या कंपनीने 2020 मध्ये विकत घेतलं. आता लवकरचं हैद्राबाद इथे या कंपनीचा प्रकल्प उभा राहणार असून, या माध्यमातून अडीच हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Megha Engineering

अडीच हजार कोटींची उलाढाल असलेल्या गोकुळमध्ये टेंडर युद्ध

हैद्राबाद स्थित मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लि. (MEIL) या बलाढ्य उद्योग समूहाची ड्रिलमेक एसपीए उपकंपनी झाली आहे आणि तेलंगणातल्या हैदराबाद इथे ही कंपनी आता स्वत:चे जागतिक उत्पादन केंद्र स्थापन करणार आहे. महत्वाचे म्हणजे हैद्राबाद इथूनचं या कंपनीचे संचलन होणार आहे.

Megha Engineering

कंत्राटदार मुंबई महापालिकेवर मेहेरबान; 30 टक्के बिलो टेंडर

ड्रिलमेक एसपीए, ऑइल-ड्रिलिंग रिग्स मॅन्युफॅक्चरिंगच्या हैद्राबाद या उत्पादन प्रकल्पासाठी 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे, यात उत्पादन, संशोधन आणि विकास केंद्र व यासाठी लागणारे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश असेल.

Megha Engineering

मुंबई उपनगरातील 'या' चौकांचे रुपडे पालटणार;19 कोटी 51 लाखांचा खर्च

ड्रिलमेकने तेल रिग आणि सहाय्यक उपकरणे तयार करण्यासाठी स्थापण्यात येणाऱ्या या इंटरनॅशनल हबसाठी तेलंगणा सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य विभागासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. ड्रिलमेकच्या प्रतिनिधीने सांगितले की, तेलंगणा सरकारसोबत काम करणे हा मोठा सन्मान असेल तसेच हे उत्पादन केंद्र सुमारे 2,500 लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com