सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी एसबीआय देणार तब्बल 5 हजार कोटी

Cidco
CidcoTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सिडको महामंडळाकडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 5 हजार कोटींचा पतपुरवठा मंजूर केला आहे. यामुळे या महागृहनिर्माण योजनेंतर्गत सुरु असणाऱ्या घरांच्या बांधकामास गती मिळून सर्वसामान्यांचे परवडणाऱ्या दरातील हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. या महागृहनिर्माण योजनेतील गृहसंकुले ही नवी मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून सर्व बाजूंनी उत्तम कनेक्टिव्हिटीने जोडलेली आहेत. त्यामुळे या गृहसंकुलांतील रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेशातील विविध व्यापारिक क्षेत्रांपर्यंत (बिझनेस डिस्ट्रिक्ट) पोहोचण्यासाठी प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

Cidco
सावधान! पुढील काही महिन्यांत EMI वाढण्याची शक्यता?

नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये सिडकोतर्फे राबवण्यात येणारी ही महागृहनिर्माण योजना 'परिवहन केंद्रीत विकास' या संकल्पनेवर आधारित आहे. ज्यात 1,12,500 सदनिकांचा समावेश आहे. यातील प्रथम टप्प्यामध्ये 23500, द्वितीय टप्प्यामध्ये 67000 आणि तृतीय टप्प्यामध्ये आणखी 22000 सदनिकांचा समावेश आहे. यापैकी 35 % सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी आहेत तर 15 % सदनिका अल्प उत्पन्न गटांसाठी व उर्वरित सदनिका खुल्या घटकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असतील.

Cidco
Good News! नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त ठरला! वाचा सविस्तर...

जागांची उपलब्धता, आर्थिक नियोजन, वैधानिक परवानग्या, प्रकल्प नियंत्रण यंत्रणा या सर्व आघाड्यांवर यशस्वीपणे काम करुन सिडकोने महागृहनिर्माण योजनेची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला. या महागृहनिर्माण योजनेतील टप्पा-1 मधील घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून टप्पा-2 मधील घरांचे बांधकामही वेगाने सुरु आहे. योजनेच्या टप्पा-3 मधील घरांच्या बांधकामासही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या गृहसंकुलांना सध्या अस्तित्वात असलेल्या हार्बर, ट्रान्स-हार्बर रेल्वे व प्रगतीपथावर असणाऱ्या नेरूळ-उरण या रेल्वे मार्गांद्वारे आणि राज्य महामार्गांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे.

Cidco
जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी 'सिडको'कडून ५०० कोटी

महागृहनिर्माण योजना प्रकल्पासाठी 30,000 हजार कोटींचा खर्च अंदाजित असून त्यापैकी 4,000 कोटींचा खर्च हा सिडकोकडून, 5,000 कोटी बॅंकेच्या पतपुरवठ्याद्वारे आणि उर्वरित खर्च हा प्रकल्पातील अंतर्गत उत्पन्न स्त्रोतांद्वारे करण्यात येणार आहे. सिडकोने या योजनेच्या मार्केटिंग आणि ग्राहक संबंध व्यवस्थापनासाठी एका खाजगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. जेणेकरून संपूर्ण विक्री प्रक्रियेदरम्यान आणि विक्री पश्चात सेवा सुलभतेने प्रदान करण्यात येतील.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे महागृहनिर्माण योजनेचे काम नियोजित वेळेत पूर्ण होणार आहे. या योजनेस 6 % व्याज दराने पतपुरवठा मंजूर करण्यात आला असून एखाद्या सार्वजनिक उपक्रम संस्थेस इतक्या कमी व्याज दराने पतपुरवठा मिळणे ही महत्वाची बाब आहे. ही महागृहनिर्माण योजना देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना ठरेल.
- संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com