खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; तब्बल एवढ्या बस..

Anil Parab
Anil ParabTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने येत्या वर्षभरात तीन हजार नव्या बसगाड्या भाडेतत्त्वावर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये विजेवरील बसबरोबरच सीएनजी, एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) गाड्यांचा समावेश असेल, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी दिली.

Anil Parab
पुणे महापालिकेने कोविड काळात केलेल्या खर्चाचे होणार 'ऑडिट'

उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरू होण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी नुकतीच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत नव्या बसगाड्या घेण्यावरही चर्चा झाली.

Anil Parab
मुंबई एअरपोर्टच्या धर्तीवर 950 कोटींतून साकारणार 19 रेल्वे स्टेशन

डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक बोजा पडत असलेल्या एसटी महामंडळाने यावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय गेल्या तीन ते चार वर्षांत नव्या बसगाड्यांची खरेदीही झाली नाही. त्यामुळे भाडेतत्त्वावर बस घेण्यात येणार आहेत. या बसगाड्यांमध्ये एक हजार बस या विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बस आहेत. तर उर्वरित बस या सीएनजी, एलएनजी असतील. डिझेलवरील काही साध्या बसही एलएनजीमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत.

Anil Parab
महापालिका बांधकाम परवाना देईना;एसटी महामंडळाने लावला टेंडरला ब्रेक

यामुळे महामंडळाची वर्षाकाठी काही कोटी रुपयांची बचत होणार आहे. कोरोना आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न होणार असून त्यावरही बैठकीत चर्चा झाली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com