एसटीच्या ताफ्यात 'अशोक लेलँड'च्या लक्झरी बसेस; दिवाळीत 300 बस येणार

ST Bus Stand - MSRTC
ST Bus Stand - MSRTCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 'अशोक लेलँड'च्या लक्झरी बसेस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अशोक लेलँडची पहिली बस दापोडीत दाखल झाली आहे. यंदाच्या दिवाळीत अशा 300 बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या बसेस 2 बाय 2 आसनी आहेत.

ST Bus Stand - MSRTC
शहरी शाळांमध्ये पोषण आहाराचा ठेका देण्याचे सर्वाधिकार 'त्या' समितीला; टेंडर पद्धत बंद

एसटी महामंडळाकडे पूर्वी 18 हजार बसेसचा ताफा होता. परंतू गेली अनेक वर्षे नवीन बस खरेदी रखडली आहे. त्यामुळे एसटी महामंडळात जुन्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या एसटी महामंडळाकडे 16 हजार बसेस आहेत. अशोक लेलँडच्या नवीन बस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. अशा 2,430 बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाचा अशोक लेलँड कंपनीसोबत बस खरेदीचा करार झाला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला लांबपल्ल्याच्या मार्गावर या बस चालविणे शक्य होणार आहे. एसटीच्या दापोडी कार्यशाळेत पहिली अशोक लेलँडने बांधलेली बस आली आहे. या बसचे रजिस्ट्रेशन दापोडीतच होणार आहे. या बसची लांबी अधिक असल्याने परिवर्तन बस प्रमाणे जादा प्रवाशांना सामावून घेता येणार आहे. दिवाळीपर्यंत अशोक लेलॅंडच्या 300 गाड्या महामंडळाला मिळतील अशी शक्यता आहे. या गाड्या महामंडळाच्या स्वमालकीच्या असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

ST Bus Stand - MSRTC
Mumbai : मुंबईतील 'त्या' 2 मोठ्या रुग्णालयांच्या 3 हजार कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाला Green Signal

एसटी महामंडळ यंदाच्या गणेश चतुर्थीच्या हंगामात प्रथमच फायद्यात आले आहे. एसटी महामंडळाला नऊ वर्षांनंतर प्रथमच ऑगस्ट 2024 मध्ये 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये फायदा झाला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बसेस देखील हळूहळू समाविष्ट होत आहेत. तसेच एलएनजीवर धावणाऱ्या बसेस देखील तयार करण्यात येत आहेत. एसटी महामंडळाने 2023 मध्ये झालेल्या 303 व्या बैठकीत महामंडळाच्या एकूण पाच हजार डिझेलवर चालणाऱ्या बसेसचे लिक्विफाईड नॅचरल गॅस ( LNG ) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या बसमध्ये रुपांतरण करण्याची योजना आखली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com