Aditya Thackeray : 'क्लस्टर डेव्हलपमेंट'च्या नावाखाली कोळीवाड्यांचा लिलाव

कोळीवाड्यांच्या हजारो एकर जागांवर कुणाचा डोळा?
Aditya Thackeray
Aditya ThackerayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील कोळीवाड्यांचे 'क्लस्टर डेव्हलपमेंट' करून भूमिपुत्र कोळी बांधवांना 'एसआरए'सारख्या इमारतींमध्ये डांबण्याचा कुटील डाव शिंदे-भाजप सरकारचा आहे. यामध्ये कोळीवाड्यांची हजारो एकर जागा सरकारच्या कंत्राटदार-बिल्डर मित्रांच्या घशात घातली जाणार आहे. मात्र याद राखा, 'क्लस्टर डेव्हलपमेंट'च्या नावाखाली कोळीवाड्यांचा लिलाव होऊ देणार नाही, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारला ठणकावले.

Aditya Thackeray
Aditya Thackeray : मुंबईतील 1 हजार एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात कोणी घातली?

राज्य सरकारने कोळीवाड्यांचा विकास क्लस्टर डेव्हलपमेंटने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नागरिकांना आणि कोळी बांधवांना हरकती-सूचना मांडण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. कोळीवाड्यांचा विकास क्लस्टर डेव्हलपमेंट या गोंडस नावाखाली 'एसआरए'सारखाच करून भूमिपुत्रांना इमारतीत डांबण्याचा हा डाव असल्याचे ते म्हणाले. मुंबईत वरळी, कुलाबा, शीव, जुहू, मढ, खारदांडा, वर्सोवा, मार्वे, धारावी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोळी बांधव आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना कोळीवाड्यांच्या विकासाबाबत महत्त्वाच्या बैठकाही झाल्या. सीमांकन करण्याचा निर्णय झाला. मात्र आता एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली कोळीवाडे बिल्डरांच्या घशात घालू पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाचेही ऐकत नाहीत. एकतर ते मालक अदानी किंवा बिल्डरचे ऐकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Aditya Thackeray
Mumbai : मुंबईतील 'त्या' 2 मोठ्या रुग्णालयांच्या 3 हजार कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाला Green Signal

मिठागरांच्या जमिनीवर पीएपीची घरे न बांधण्याचे धोरण पाळले नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोळीवाड्यांमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या विविध समाजाच्या नागरिकांनी कुठे जायचे, असा सवालही त्यांनी केला. म्हणूनची ही लढाई असल्याचेही ते म्हणाले. सरकारचा मुंबईच्या भूमिपुत्रांवर इतका आकस का, असा सवालही त्यांनी केला. आमचे सरकार आल्यावर पब्लिक कन्सल्टेशन, ग्लोबल एक्स्पर्ट कन्सल्टेशन, ग्लोबल एक्स्पर्ट कन्सल्टन्सीनुसारच आणि भूमिपुत्र, व्यावसायिक कोळी महिला यांच्याशी चर्चा करूनच कोळीवाड्यांचा विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोळी बांधव राहत असलेल्या ठिकाणीच त्यांचा व्यवसाय असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. संस्कृती परंपरा जपत ते तिथेच राहत आहेत. त्यामुळे कोळीवाड्यांच्या विकासात कोळी बांधवांना आहे त्याच ठिकाणी घर मिळायला हवे, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली. मी शब्द देतो की सगळ्या जिह्यातल्या कोळी बांधवांचे सेल्फ रीडेव्हलपमेंट करून त्यांना जिथे आहेत तिथेच घर देणार असे ठाम आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कोळीबांधवांना क्लस्टर नाही तर स्वतःचे हक्काचे घर मिळायला हवे, असेही ते म्हणाले. यासाठी आम्ही कोळीवाडे कदापि नष्ट होऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Aditya Thackeray
Mumbai : कोस्टल रोडच्या 'त्या' टप्प्यासाठी 'एमआयपीएल-केएस' सल्लागार; 164 कोटींचे टेंडर

मुंबईतील कोळीवाडे अनेक एकरांत पसरले आहेत. या ठिकाणी कोळी बांधवांची प्रशस्त घरे आहेत. असे असताना क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये एका कोपऱ्यांत भूमिपुत्र कोळी बांधवांना 'स्क्वेअर फुटांत' डांबून समुद्रालगतची शेकडो एकर जागा बिल्डरला देण्यात येणार असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. ही पॉलिसी सरकारने नाही तर कुठल्यातही बिल्डरने बनवली असून अन्यायकारक हाऊसिंग पॉलिसी ड्राफ्टची सत्ता येताच पहिल्याच दिवशी होळी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी कोळी बांधवांना जबरदस्ती घराबाहेर काढण्यासाठी स्लम एव्हिक्शन फोर्स बनवली जाणार आहे. हे सरकार नक्की कुणासाठी आहे? आम्ही कोळीवाडे कदापि नष्ट होऊ देणार नाही. त्यासाठीच ही लढाई आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com