Uddhav Thackeray : सत्तेवर आल्यास धारावीचे टेंडर रद्द करणार; सरकारकडून ‘कंत्राटदार माझा लाडका योजना’ सुरू

Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ‘‘सत्तेत आल्यावर धारावी प्रकल्पाचे टेंडर रद्द करू,’’ असा निर्धार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुखे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला.

Uddhav Thackeray
Good News : जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडीत फूड प्रोसेसिंग पार्क उभारणार

येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की धारावीकरांना मुलुंड, दहिसर, मिठागरात टाकायचा या सरकारचा डाव आहे. त्यांची ‘कंत्राटदार माझा लाडका योजना’ सुरू आहे. त्यामुळे मुंबईत पावसात सगळीकडे पाणी तुंबतंय. बीएमसीची ९० हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता किती राहिल्यात ते सांगत नाहीत. ‘एमएमआरडीए’ला महापालिका पैसा देत आहे. महापालिका असताना ‘एमएमआरडीए’ची गरजच नसल्याचे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता असलेली ठाणे महापालिका डबघाईला आली असल्याकडे लक्ष वेधत शिंदेंवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
Mumbai : शेतकरी, निर्यातदारांसाठी गुड न्यूज! 285 कोटी खर्चून JNPT मध्ये उभारणार 'हा' महत्त्वाचा प्रकल्प

...तर मुंबई उपऱ्यांच्या हातात जाईल

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. ‘हा लढा शिवसेनेच्या अस्मितेचा नसून मुंबईच्या अस्तित्वाचा आहे. अजूनही पक्षातून कोणाला जायचे असेल तर जा. दगाबाजी करू नका. शिवसैनिकांना घेवून मी ही लढाई जिंकेन. काही माजी नगरसेवक जातायत. त्यांनी आताच जावे,’ असे म्हणत ठाकरे म्हणाले की, हे व्यापारी आपल्यात फूट पाडतायत. एवढे खाताय ते जातंय कुठे? खायला काही मर्यादा आहे की नाही? धनाढ्य व चोऱ्यामाऱ्या करणारे दुबार मतनोंदणी करताहेत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्याच्या हातात जाईल, असा इशारा त्यांनी दिला. हातात भिकेचा कटोरा घेऊन तुम्हाला आमच्यासमोर यावे लागेल. या लोकांविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती पण आम्ही बोललो,’ असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

मुस्लिमांना आमचं हिदुत्व मान्य

ठाकरे यावेळी म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीवेळी एका प्रचारसभेत मोठ्या संख्येने मुस्लिम आले होते. तिथं मी जाहीरपणे त्यांना प्रश्न केला की मी हिंदुत्व सोडलंय का? त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं आणि तुमचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचंही सांगितलं. मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर समाजही आपल्यासोबत येत आहेत,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक गृहसंकुलांमध्ये, कंपन्यांमध्ये मराठीला प्रवेश नाही म्हणतात. पहिले कानफाट फोडा. गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करतायत,’ असा संताप ठाकरेंनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com