मुंबई मेट्रो स्थानकात गळतीमुळे बादल्या ठेवण्याची वेळ; बांधकामाच...

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रोचे (Mumbai Metro) '२ ए' व ७ हे मार्ग सुरू झाले आहेत. ही स्थानके नवीन असून, पावसाळ्यात यातून गळती सुरू झाली आहे. या स्थानकात बादल्या ठेवण्याची वेळ मेट्रो प्रशासनावर आली आहे. यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Mumbai Metro
Mumbai Metro-12 : 'MMRDA'ने काढले 'या' कामांसाठी टेंडर

मुंबई मेट्रो २ ए मार्गावर दहिसर पूर्व ते अंधेरी (प.) व मेट्रो ७ हा मार्ग दहिसर पूर्व ते गुंदवली दरम्यान आहे. या दोन मार्गिकांची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने केली आहे, तर परिचलन व देखभाल महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून केली जाते. मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल मीडियावरून या गळतीची वस्तुस्थिती मांडली आहे, तर काही स्थानकांच्या भिंतीतून गळती होत आहे. दहिसर (पू.) मेट्रो स्थानकात अनेक ठिकाणी गळती होत आहे. या स्थानकात अनेक ठिकाणी बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे, असे प्रवाशी सांगत आहेत. तर अन्य एका प्रवाशाने सोशल मीडियावर म्हटले की, कितीही पैसे खर्च केले तरीही मुंबईच्या पावसाळ्यात बादली कामाला येतेच. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुरू असलेल्या कांदिवली (प.) स्थानकातील परिस्थितीही अशीच आहे.

Mumbai Metro
Bullet Train मुहूर्त ठरला? 11000 कोटीच्या 24 जपानी गाड्यांची खरेदी

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे व गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या ब्रीजवरील छतच टाकलेले नाही, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली. मेट्रो स्थानकात होणारी गळती एमएमआरडीए व एमएमएमओसीएलच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर या दोन्ही संस्थांनी खुलासा करताना सांगितले की, उघड्या दर्शनी भागामुळे स्थानकांमध्ये पाणी शिरते आणि भिंती ओलसर होतात. आम्‍हाला या समस्येची पूर्ण जाणीव आहे आणि ती सोडवण्‍यासाठी काम करत आहोत. आमचे कर्मचारी स्थानकांमध्‍ये कोणत्याही गळती किंवा प्रवेशाचे ठिकाण ओळखण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. आम्ही रेल्वे स्थानकाची वेळोवेळी तपासणी करत असतो. या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. प्रवाशांसाठी चांगली सुविधा देण्याचे महत्त्व आम्हाला आहे. दरम्यान, ''आमच्या स्टेशनमध्ये सुधारणा करण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे संचालक (देखभाल), एमएमएमओसीएल सुशील चंद्रा यांनी सांगितले.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com