Pune : इलेक्ट्रिकला 'टाटा'; पुणेकरांची पेट्रोल-डिझेल वाहनांनाच पसंती का?

pune city
pune cityTendernama
Published on

पुणे (Pune) : दसरा व दिवाळीच्या काळात ५५ हजार नवीन वाहने रस्त्यावर दाखल झाली आहेत. पुण्यात ३३ हजार तर पिंपरी चिंचवडमध्ये २२ हजार नवीन वाहनांचा समावेश आहे.

pune city
Pune : अपघात वाढले; रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे

नवीन वाहनामध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. तसेच चारचाकीमध्ये ‘हायब्रीड’ व ‘इलेक्ट्रिक’चा पर्याय उपलब्ध असला तरीही ग्राहकांनी पेट्रोल व डिझेलवरील वाहने खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मागणी कमी आहे.

पुण्यात दसऱ्याच्या काळात सुमारे ११ हजार वाहनांची विक्री झाली आहे. तर दिवाळीच्या काळात २२ हजार वाहनांची विक्री झाली आहे. दसऱ्यापेक्षा अधिक विक्री दिवाळीच्या काळात झाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये देखील दसऱ्याच्या तुलनेत दिवाळीला जास्त विक्री झाल्याची आरटीओ कार्यालयात नोंद झाली आहे. पिंपरीमध्ये दसऱ्याच्या काळात सुमारे आठ हजार तर दिवाळीच्या काळात १४ हजार नवीन वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वाहनाच्या विक्रीत वाढ झाली आहे.

pune city
Mumbai : राज्यातील 3 लाख कंत्राटदार का झाले आक्रमक?

खासगी वाहनांकडे वाढता कल
पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे साधने उपलब्ध असतानादेखील नागरिकांचा कल स्वतःचे वाहन खरेदी करण्याकडे अधिक वाढत चालला आहे. कोरोनानंतर पुण्यात खासगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

आकडे बोलतात
वर्ष.....पेट्रोल व डिझेल.....विद्युत
२०२२.....१८,८२४.....१,९२९
२०२३.....२०,०८३.....१७०२
२०२४.....२१,२४७.....६५८
(ही आकडेवारी दसरा ते दिवाळीच्या काळात पुणे आरटीओ कार्यालयात नोंद झालेल्या वाहनांची आहे)

pune city
Vijay Wadettiwar : सत्ताधाऱ्यांनी 30 टक्क्यांची मर्यादा ओलांडून केली टेंडरची खैरात

सर्वसाधारपणे ग्राहकांचा दुचाकी वाहनांच्या खरेदीकडे अधिक कल आहे. दसरा व दिवाळीच्या काळात झालेल्या वाहनांची विक्री अधिक असल्याने ‘आरटीओ’च्या महसुलातदेखील मोठी वाढ झाली आहे. सुमारे १०८ कोटींचा महसूल पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

खासगी वाहनाच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी वाहनांची संख्या वाढली आहे.
- स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com