Pune : पूर्व भागातील रिंगरोड अखेर लागणार मार्गी; MSRDCकडे काम गेल्याने आता...

Ring Road
Ring RoadTendernama
Published on

पुणे (Pune) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सोलापूर रस्ता ते पुणे-बंगळूर रस्त्यादरम्यानचा सुमारे ३१ किलोमीटरचा प्रस्तावित रिंगरोड पुन्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) वर्ग केला आहे. या रस्त्याचे काम तीन टप्प्यांत होणार असून ‘एमएसआरडीसी’ने टेंडर मागविले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण रिंगरोडचे काम बारा टप्प्यांत होणार आहे.

Ring Road
Mumbai : 'तो' 17 हजार घरांचा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासातील मैलाचा दगड

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्‍चिम असे रिंगरोडचे दोन भाग केले आहेत. पूर्व भागातील रिंगरोड पाच तालुक्यांतून जातो. त्यात हवेली तालुक्याचाही समावेश आहे. या भागातील रिंगरोडसाठी आतापर्यंत ७० टक्के जमिनीचे भूसंपादन महामंडळाने केले आहे. ‘एनएचएआय’ने पुणे ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. हा प्रस्तावित रस्ता आणि रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे सोलापूर ते पुणे-बंगळूर रस्त्यादरम्यानच्या ३१ किलोमीटर रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असे यापूर्वी ठरले होते. त्यामुळे ३१ किलोमीटर रस्त्याचा भाग वगळून उर्वरित रस्त्याच्या कामासाठी ‘एमएसआरडीसी’ने निविदा मागविल्या होत्या; परंतु प्राधिकरणाने मध्यंतरी निर्णयात बदल करत ३१ किलोमीटर रस्त्याचे काम पुन्हा महामंडळानेच करावे, असे सांगत रस्ता पुन्हा ‘एमएसआरडीसी’कडे वर्ग केला.

Ring Road
Tendernama Exclusive : राज्य सरकारचा आणखी एक महाप्रताप! 'लाडका आमदार' योजनेअंतर्गत भूखंड वाटपासाठी धोरणच बदलले

त्यामुळे आता ‘एमएसआरडीसी’ने ३१ किलोमीटर रस्त्याचे तीन टप्पे करून टेंडर मागविले आहेत. टेंडर भरण्याची अंतिम मुदत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिली आहे, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे रिंगरोडचे काम बारा टप्प्यांत होणार आहे. यापूर्वी काढलेले टेंडर अंदाजित रकमेपेक्षा ४० ते ४५ टक्के जादा दराने आल्यामुळे वादग्रस्त ठरल्या आहेत.

असा आहे पूर्व भागातील रिंगरोड

- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग-नाशिक-सोलापूर आणि सातारा-बंगळूर महामार्गाला जोडणारा

- मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यातून जाणार

- पाच तालुक्यांतील ४६ गावांतून रिंगरोड जाणार

- एकूण लांबी १०३ किलोमीटर, तर रुंदी ११० मीटर

- सहा पदरी महामार्ग-एकूण सात बोगदे, सात अंडरपास, दोन नदीवरील आणि दोन रेल्वे मार्गावरील पूल

- ८५९.८८ हेक्टर जागा संपादित करावी लागणार, त्यासाठी अंदाजे १,४३४ कोटी खर्च

- महामार्ग बांधणीचा खर्च सुमारे चार हजार ७१३ कोटी

या गावातून जाणार रिंगरोड

१. मावळ : परंदवाडी, उर्से, तळेगाव, वडगाव मावळ, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोली तर्फे चाकण, इंदोरी, सुदवडी, सुदुंबरे.

२. खेड : खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव.

३. हवेली : तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, भिवरी, पेठ, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची.

४. पुरंदर : सोनोरी, काळेवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, कोडीत खुर्द, गराडे.

५. भोर : कांबरे, नायगाव, केळवडे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com