Pune Airport: पुणे विमातळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुश खबर! आता फक्त...

Pune Airport New Terminal
Pune Airport New TerminalTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरुन (New Terminal Pune Airport) प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना आता कमी दरात चहा, कॉफी व पाण्याची बाटली उपलब्ध होणार आहे. यासाठी एक स्टॉल राखीव ठेवण्यात येणार आहे. यातील पदार्थांचे दर टर्मिनलमधील अन्य स्टॉलच्या तुलनेत अत्यंत कमी असणार आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Pune Airport New Terminal
रस्तेबांधणीच्या 'त्या' प्रकल्पामुळे 1 लाख कोटींचा खड्डा! उच्च न्यायालयात याचिका

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे २०० रुपयांना तर पाण्याची बाटली ६० ते ८० रुपयांना विक्रीस आहे. सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरु केली आहे. मात्र टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर सामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत.

जुन्या टर्मिनलमध्ये एका स्टॉलवर कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध आहे. नवीन टर्मिनलवर मात्र एकाही स्टॉलवर कमी किमतीत पदार्थांची विक्री केली जात नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे.

Pune Airport New Terminal
Nitin Gadkari : पालखी मार्ग होणार ग्रीन हायवे; पुण्यातील कोंडीसाठी ‘मास्टर प्लॅन’

चहा, पाणी २० रुपयांत

विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर चहा व पाण्याची बाटली २० रुपयांना देण्याच्या विचारात आहे. यासाठी एक छोटा स्टॉल सुरू होणार आहे. सध्या नवीन टर्मिनलवर १२० विमानांची वाहतूक होते. काही दिवसांत ती वाढणार आहे. त्यामुळे १० ते १५ दिवसांत नवीन स्टॉल प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची आशा आहे.

पी. चिदंबरम यांची पोस्ट चर्चेत

गेल्या आठवड्यात देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोलकता विमानतळावर एक चहा ३४० रुपयांना घेतला असल्याची पोस्ट केली होती. चहाच्या दरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांची एक्सवरील पोस्ट समाज माध्यमांत खूप व्हायरल झाली. परिणामी या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे कोलकता विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

Pune Airport New Terminal
TENDERNAMA IMPACT : प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडून काढला ‘रोहयो’चा कार्यभार

सामान्य प्रवाशांसाठी नवीन टर्मिनलवर एक स्टॉल सुरू केला जाणार आहे. यात प्रवाशांना माफक दरात चहा, कॉफी व पाण्याची बाटली घेता येईल.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com