नवी मुंबई पालिका 'फुकटात' उभारणार 150 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प

Navi Mumbai Municipal Corporation
Navi Mumbai Municipal CorporationTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मध्य वैतरणा धरणात उभ्या करण्यात आलेल्या तरंगत्या सौर ऊर्जा (Floating Solar Power Plant) प्रकल्पाच्या धर्तीवर आता खालापूर येथील मोरबे धरणातही (Morbe Dam) अशाच प्रकारचा प्रकल्प ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) मागविलेल्या टेंडरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देश-विदेशातील एकूण १९ बड्या कंपन्या या टेंडर प्रक्रियेत उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Navi Mumbai Municipal Corporation
मोदींच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन; तब्बल 21 किमीच्या बोगद्यासाठी...

नवी मुंबई महापालिकेच्या मालिकीच्या खालापूर येथील मोरबे धरणात १५० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारा सौरऊर्जा प्रकल्प पाच वर्षांपूर्वी रद्द करण्यात आला होता. त्यानंतर त्याच जागी ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर मुंबई पालिकेच्या मध्य वैतरणा धरणातील प्रकल्पाप्रमाणेच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीच्या टेंडरला चांगला प्रतिसाद लाभला. देशातील आणि परदेशातील एकूण १९ सौरऊर्जा तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या बड्या कंपन्या या टेंडरच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. या स्पर्धेत टाटा, महाजेनको आणि पॉवर कॉर्पोरेशनसारख्या बड्या कंपन्या आहेत. सिंगापूरमधील तीन कंपन्याही स्पर्धेत आहेत.

Navi Mumbai Municipal Corporation
सोमय्यांचा 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा? संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

तुकाराम मुंढेंनी रद्द केला होता आधिचा प्रकल्प

खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर नवी मुंबई पालिकेची मालकीचे मोरबे धरण आहे. ४०० दशलक्ष लिटर पाण्याचा दररोज उपसा होईल, असे हजारो एकर जागेवर हे विस्तीर्ण धरण आहे. या धरणाच्या मातीच्या भिंतीवर पॅनल बसवून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने पाच वर्षांपूर्वी तयार केला होता. त्यासाठी १५२ कोटी रुपये खर्च होणार होते. मात्र, तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा अवास्तव खर्चाचा प्रकल्प रद्द केला होता. त्यामुळे हा प्रकल्प अडगळीत पडला होता.

आता नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हा प्रकल्प पालिकेचा निधी खर्च न करता उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेने मध्य वैतरणा धरणात अशा प्रकारचा प्रकल्प उभारला आहे.

Navi Mumbai Municipal Corporation
मुंबई एअरपोर्टच्या धर्तीवर 950 कोटींतून साकारणार 19 रेल्वे स्टेशन

धरणाच्या पाण्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प

मोरबे धरण परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो. माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरण परिसरात उन्हाचा कडाकाही पावसाएवढाच तीव्र आहे. धरणाच्या भिंतीवर लोखंडी पॅनल उभारून भिंतीला धोका निर्माण करण्यापेक्षा हे पॅनल धरणाच्या पाण्यात उभारण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे सौर ऊर्जा पॅनलवर धूळ साचण्याचे प्रमाण कमी होत असल्याने जास्तीत जास्त ऊर्जाची साठवण करता येण्यासारखी आहे.

Navi Mumbai Municipal Corporation
राज्यात दरवर्षी 12 हजार कोटींचा वीज घोटाळा!

टेंडरच्या स्पर्धेत १९ बड्या कंपन्या

नवी मुंबई पालिकेने या प्रकल्पासाठी कंपन्यांकडून टेंडर मागविले होते. देश-परदेशातील १९ कंपन्यांनी या टेंडरला प्रतिसाद दिला होता. यात खोपोली येथे ब्रिटीशकालीन हायड्रो वीज प्रकल्प उभारणाऱ्या टाटा पॉवर कंपनीचाही समावेश आहे. यापूर्वी टाटाने शहरात १४०० सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम मिळवले आहे. त्यामुळे टाटाच्या सहभागामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे.

Navi Mumbai Municipal Corporation
पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 3000 कोटींचा 'टीडीआर'...

१०० मेगावॉट वीजनिर्मितीमुळे पालिकेचा होणार फायदा

धावरी नदीवर असलेल्या मोरबे धरणावर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून १०० मेगावॉट वीज निर्माण करता येणार आहे. सर्वाधिक दर देणाऱ्या कंपनीला हे काम दिले जाणार असून, या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सार्वजनिक वीज वापरावर ४० टक्क्यांनी बचत होणार आहे. पालिकेचा सार्वजनिक विजेचा खर्च वर्षाला ११५ कोटी रुपये आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com