Mumbai-Pune आणखी जवळ येणार; 'त्या' मार्गासाठी 3 हजार कोटींचे टेंडर

Mumbai Pune Expressway
Mumbai Pune ExpresswayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई-पुण्यातील अंतर आणखी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेएनपीए नजीकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई-पुणे दुर्तगती महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत २९.१५ किलोमीटर लांबीचा नवा सहापदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे ३,०१० कोटींचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Mumbai Pune Expressway
Mumbai : खारघर-तुर्भे लिंक रोडचा लवकरच नारळ; वाशी ते खारघर पोहचा दहाच मिनिटांत

या नव्या हरित महामार्गामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे शहराच्या अधिक जवळ येणार आहे. सध्या या नव्या हरित महामार्गाची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतूच्या लोकार्पणानंतर भविष्यात कोकण हायवेमुळे गोवा राज्याचे अंतरही दोन तासांनी कमी होणार आहे. सध्या रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाचे काम विविध टप्प्यात सुरू केले असून यातील महत्त्वाचा टप्पा रेवस ते करंजा या धरमतर खाडीवरील पुलाचा आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबाग ते मुंबई हे अंतर अवघ्या ४० मिनिटात गाठता येणार आहे.

Mumbai Pune Expressway
Mumbai : 'त्या' मोक्याच्या 29 एकर जागेचा विकास अदानीच करणार; 'एलॲण्डटी'ला टाकले मागे

अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच त्याला मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह जुन्या मुंबई पुणे महामार्गाला जोडण्यासाठी एमएमआरडीएकडून चिर्ले येथे आंतरमार्गिकांचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जेएनपीए बंदरातून अवजड कंटेनर ट्रकच्या वाहतुकीमुळे हाेणारी वाहतूककोंडी आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरील ताण कमी करण्यासाठी चिर्ले टोकापासून ते गव्हाणफाटा आणि पळस्पेफाटा ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापर्यंत ७.३५ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधला जाणार आहे, त्यावर १३५१.७३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज्य सरकारकडूनही ही कामे सुरू असतानाच आता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई-पुणे दोन्ही शहरे जवळ आणण्यासाठी खासगीकरणातून जेएनपीटी नजिकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई-पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत २९.१५ किमी लांबीचा नवा सहा पदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर ३०१० कोटी ३६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग बांधून झाल्यानंतर कंत्राटदार टोलच्या माध्यमातून खर्च वसूल करणार आहे. या मार्गाचा पुण्यासह कर्जत-खोपोली परिसराला मोठा लाभ होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com