Nashik : सिटीलिंकला 'या' मार्गावर का केला प्रवेश बंद?

Maharashtra Police
Maharashtra PoliceTendernama
Published on

नाशिक (Nashik) : दिवाळीमुळे नाशिक शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी आणि त्यातच शहर बससह अवजड वाहनांमुळे कोंडी होते. ऐन सणासुदीत होणाऱ्या कोंडीच्या समस्येने व्यावसायिक व ग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर याची गंभीर दखल शहर पोलिस वाहतूक शाखेने घेतली असून, रविवार (ता. ३) पर्यंत मुख्य बाजारपेठेतून सिटीलिंक बसला प्रवेश बंद केला आहे.

Maharashtra Police
Pune : रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे रेल्वे स्थानकावर 'यांना' प्रवेशच नाही

यामुळे रविवार कारंजा, शालिमार परिसरात कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. सध्या शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे. तसेच, रविवार कारंजा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, नेहरू गार्डन, शालिमार येथे विक्रेते, फेरीवाल्यांचीही गर्दी असते. यामुळे रविवार कारंजा ते शालिमार, एमजी रोडवर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते.

त्यातच, सिटीलिंक बस याच मार्गाने धावतात. या बसमुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीच भर पडते. विशेषत: रविवार कारंजा याठिकाणी रस्ता अरुंद असल्याने आणि चौकातच विक्रेते बसलेले असतात. अशावेळी बस आल्या की वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. यामुळे रविवारपर्यंत (ता. ३) सदर वाहतुकीत बदल केले असून, सिटीलिंक बसचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, अशी अधिसूचना शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

Maharashtra Police
Mumbai : राज्यातील 3 लाख कंत्राटदार का झाले आक्रमक?

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर वाहतूक शाखेला त्यांनी तातडीने उपाय करण्याचेही आदेश दिले होते. या बातमीमध्ये कोंडी सोडविण्यावर उपायही सुचविले होते. त्यानुसार, मुख्य बाजारपेठेतून धावणाऱ्या सिटीलिंक बस दिवाळीपुरते तात्पुरता पर्यायी मार्गाने धावल्यास काही अंशी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होऊ शकणार आहे. त्यानुसार शहर वाहतूक शाखेने सिटीलिंक बसला रविवार कारंजामार्गे शालिमार व सीबीएसमार्गे अशोकस्तंभ, रविवार कारंजाकडून निमाणीकडे जाण्या-येण्यास प्रवेश बंद केला आहे.

प्रवेश बंद मार्ग

- निमाणी येथून पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, सांगली बँक, नेपाली कॉर्नर, शालिमार आणि सीबीएसकडून रविवार कारंजा, पंचवटी कारंजा कडून निमाणीकडे येणाऱ्या बसला प्रवेश बंद

पर्यायी मार्ग

- निमाणीकडून सीबीएसकडे जाणाऱ्या बस दिंडोरी नाका, पेठ नाका, मखमलाबाद नाका, रामवाडी, अशोक स्तंभ, मेहेर सिग्नलमार्गे इतरत्र

- सीबीएसकडून निमाणीकडे जाणाऱ्या बस अशोकस्तंभ, जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, बायजाबाई छावणी, मखमलाबाद नाका, पेठफाटा, दिंडोरी नाका, निमाणी मार्गे इतरत्र.

Maharashtra Police
Nashik : मजिप्रच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची केवळ 58 टक्के कामे; अपूर्ण योजनांमुळे...

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासंदर्भात रविवार कारंजा ते शालिमार या मार्गावरील सिटी लिंक बसला रविवारपर्यंत (ता. ३) प्रवेश बंद केले आहे. बाजारपेठेतील कोंडी सोडविण्यासाठी आणखीही काही उपाययोजना केल्या जातील.

- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com