नाशिक महापालिकेत नेमकी झाडलोट कशाची?; यांत्रिकी झाडूंसाठी टेंडर

यांत्रिकी झाडूद्वारे होणार शहरातील रिंगरोडची स्वच्छता
Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : शहरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी सातशे कर्मचारी आऊटसोर्सिंगने भरती केल्यानंतर आता रिंगरोड (Ring Road) स्वच्छतेसाठी विभागनिहाय सहा यांत्रिक झाडू (Electronic Groom) खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी टेंडर (Tender) प्रसिद्ध करण्यात आले असून, यांत्रिकी झाडूची किंमत कमी असली तरी देखभाल दुरुस्तीसाठी तिप्पट खर्च होणार आहे. त्यामुळे नेमकी कसली झाडलोट महापालिकेत (Nashik Municipal Corporation) सुरु आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Nashik
'टेंडरनामा' ग्राउंडरिपोर्ट; रस्ता उखडलेला अन् ठेकेदाराचे हात वर

स्वच्छ शहर स्पर्धेत येण्यासाठी महापालिकेने कंबर कसताना होऊ द्या खर्च असेचं धोरण अवलंबिले आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी सातशे कर्मचारी आऊटसोर्सिंगने भरले. आता रिंगरोडसाठी यांत्रिकी झाडू खरेदी केले जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या महासभेत ३३ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

Nashik
'टेंडरनामा'चा आवाज; ठेकेदार-अधिकाऱ्यांतील संगनमत उघड

केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त निधीमधून या यंत्रखरेदीसाठी खर्च केला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. यांत्रिक झाडू खरेदी करणे तसेच पुढील पाच वर्षासाठी त्याची देखभाल-दुरुस्ती व ऑपरेट करण्यासाठी ३३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील सहाही विभागांसाठी सहा यांत्रिकी झाडू खरेदीसाठी टेंडर मागविण्यात आले आहेत.

Nashik
नाशिक महापालिकेकडून यासाठी दहा वर्षांचे टेंडर काढण्याचा खटाटोप

यंत्र दोन कोटींचे संचलन २१ कोटींचे

शहरात अंतर्गत २,१५० किलोमीटर रस्ते असून त्यातील ९० किलोमीटरचे रिंगरोडची स्वच्छता यांत्रिकी झाडूने केली जाणार आहे. एका यंत्राची किंमत दोन कोटी सहा लाख रुपये आहे. त्यानुसार सहा यंत्रांसाठी १२ कोटी ३६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. सहा यांत्रिक झाडूला पाच वर्षांच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी दर महा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च येईल. पाच वर्षांसाठी २१ कोटी आठ रुपये खर्च येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com