हिवाळी अधिवेशन निश्चित झाले अन् कंत्राटदार झाले खूश

५० कोटींच्या कामाचे नियोजन; सा.बा. विभाग लागला तयारीला
Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर : हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येणार असल्याने कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चांगलेच खूश झाले आहेत. अधिवेशनाच्या दरम्यान कोट्‍यवधींची कामे केली जातात. यंदा सुमारे ५० कोटी रुपयांची कामांचे नियोजन केले आहे.

Nagpur
नादखुळा! टेंडर नाही मंजूर अन् काम आले निम्म्यावर

बांधकाम विभागाने आपापल्या कंत्राटादारांना कामे वाटपाचे नियोजन करणे सुरू केले आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून अधिवेशनच झाले नाही. दरवर्षी अधिवेनानिमित्त आमदार निवास, मंत्र्यांचे निवासस्थान रविभवन, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी आणि व उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरीची रंगरंगोटी केली जातो. फर्निचर बदलले, पडदे, सोफे बदलले जातात. याशिवाय विधिमंडळ परिसरातील रस्ते, फुटपाथचे सुशोभिकरण केले जाते. पथदिवे बदलले जातात. यावर कोट्‍यवधी रुपये खर्च केले जातात.

Nagpur
टेंडर रद्द करून सरकारने टाळला दरवर्षीचा १२५ कोटींचा भुर्दंड, कसा?

सात डिसेंबरपासून अधिवेशन निश्चित केले आहे. यानिमित्त विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी उच्चस्तरीय समीक्षा बैठकीनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल, असे स्पष्ट संकेत दिले आहे. तेव्हापासून अधिवेशनाच्या तयारीने गती पकडली आहे. साधारणत: ३० कोटी रुपयांच्या कार्याची टेंडर जारी करण्यात आली आहेत, तर २० कोटी रुपयाच्या कामाचे टेंडर प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. हे सगळे टेंडर लवकरच वितरित केल्या जातील, असे पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी सांगितले. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत बहुतांश कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. कोरोना संक्रमण बघता २०१९ च्या तुलनेत आणखी काही टेंडर जारी करण्यात आले आहेत. यात लिक्विड सॅनिटायझेशनचा पुरवठा व कीटकनाशकांची फवारणी आदी कार्यांचा समावेश आहे.

Nagpur
नाशिक महापालिकेकडून यासाठी दहा वर्षांचे टेंडर काढण्याचा खटाटोप

कंत्राटदार काम करण्यास सज्ज
२०१९ च्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या जवळपास ५० कोटी रुपयाच्या कामाचे बिल अद्याप पेंडिंग असल्याने कंत्राटदार नाराज आहेत. कंत्राटदारांच्या मतानुसार नागपूर प्रदेशात जवळपास ५०० कोटी रुपयांचे बिल पेंडिंग आहेत. हा पैसा मिळण्यासाठी त्यांनी आंदोलनही पुकारले होते. अशा स्थितीतही ते हिवाळी अधिवेशनाची कामे करण्यास तयार आहेत. दिवाळीपूर्वी पैसा मिळेल अशी आशा कंत्राटदार असोसिएनने व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com