सत्ता जाण्याची चाहूल लागताच पालकमंत्री राऊतांनी वाटप केले...

Nitin Raut
Nitin RautTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : सुमारे सव्वादोन वर्षे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मंत्रीपद जायच्या आदल्या दिवशी आपल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाला १९ कोटी रुपयांचा निधी दिला. तसेच आभासी पद्धतीने सात कामांचे भूमिपूजन करून आगामी निवडणुकीची तयारी केली.

Nitin Raut
रस्ते घोटाळा प्रकरणी क्लिन चिट! बच्चू कडूंना बंडखोरीचे बक्षिस?

बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. सत्ता जात असल्याचे संकेत मिळताच पालकमंत्री नितीन राऊत कामाला लागले. तिकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत धडाधड निर्णय होत असताना नितीन राऊत यांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित फाईलवरची धूळ झटकली. तडकाफडकी निधी मंजूर केला. दुसऱ्याला श्रेय भेटू नये याकरिता ऑनलाईन भूमिपूजनाचा कार्यक्रमसुद्धा आटोपला.

Nitin Raut
'समृद्धी'वरील प्रवास आता सुसाट! 'या' जोडीचा मिळणार 'बूस्टर'

समारे १९ कोटी ५ लाख खर्चाच्या सात विकास कामांचे त्यांनी भूमिपजून केले. यामुळे उत्तर नागपूरचा चेहरामोहरा बदलेल असा दावा राऊत यांनी यावेळी केला. वितरित केलेल्या निधीत १५ कोटी ७९ लाख रुपये आमदार निधी, दलित्तेत्तर विकास निधी ६० लाख ७६ हजार, दलित वस्ती विकास योजनेत १०१ लाख ३८ हजार, नागपूर सुधार प्रन्यासच्या सुमारे चार कोटींच्या निधीचा समावेश आहे. यातून सिमेंट रस्ते, टॉयलेट ब्लॉक तसेच जिम इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. मार्टिननगर, मौजा नारा, कस्तुरबा नगर, जरीपटका, कल्पनानगर कळमना, शिवाजी चौक, वनदेवी नगर, यशोधरानगर, महेंद्रनगर या क्षेत्रात ही विकासकामे होणार आहेत.

Nitin Raut
सरकार बदलल्यास नागपूर सुधार प्रन्यासचे काय होणार? कर्मचारी चिंतेत

पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडून उत्तर नागपूरच्या जनतेला मोठ्‍या अपेक्षा होत्या. पाच वर्षांचा ब्रेक देऊन त्यांना जनतेनी विधानसभेत पाठवले होते. पहिल्याच मंत्रिमंडळाता त्यांचा समावेश झाला. ऊर्जा खाते त्यांना देण्यात आले. सोबतच नागपूरचे पालकमंत्रीपद चालून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात विकास कामाने आपला दबदबा निर्माण करण्याची संधी त्यांना चालून आली होती. मात्र अडीच वर्षे राऊत यांना आपल नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत याचाच विसर पडला होता. फक्त ऊर्जामंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार एवढ्याच मर्यादेत मश्गुल राहिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com