Murlidhar Mohol
Murlidhar MoholTendernama

Murlidhar Mohol: 'या' कारणामुळे विमानसेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात..! काय म्हणाले मंत्री मोहोळ?

Published on

नवी दिल्ली (New Delhi) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनात साकार होणाऱ्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीमध्ये हवाई वाहतूक क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे देशाल जगातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनवण्याच्यादृष्टीने नवीन विमानतळे, नवे हवाई रस्ते निर्माण करण्याचे आणि नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा शाश्‍वत विकास करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Murlidhar Mohol
मंत्री दिलीप वळसे-पाटलांनी पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाबाबत केली मोठी घोषणा

नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आशिया-पॅसिफिक नागरी हवाई वाहतूक परिषदेचे नुकतेच आयोजन केले होते. त्यावेळी मोहोळ बोलत होते.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू आणि आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेचे अध्यक्ष साल्वाटोर स्कियाचितानो यांच्यासह जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया व जगभरातील २९ देशांचे विमान वाहतूक मंत्री, राजदूत व अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने परिषदेचा समारोप झाला.

Murlidhar Mohol
'ते' टेंडरही 'अदानी'लाच!; तब्बल 25 वर्षे कंपनी राज्याला वीज पुरवणार

आशिया-पॅसिफिक जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मुरलीधर मोहोळ यांना मिळाली. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच जागतिक परिषदेत मोहोळ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ही बाब पुण्यासाठी गौरवाची आहे.

Murlidhar Mohol
Mumbai Metro: मुंबईकरांना लवकरच मिळणार गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

मोहोळ म्हणाले...

- गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हवाई सेवांमध्ये कमालीची प्रगती

- २०२५ पर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात एकूण मनुष्यबळात २५ टक्के वाटा महिलांचा असावा हे ध्येय

- विमान क्षेत्रास पर्यावरणपूरक बनविण्यासाठी विमान इंधनात शाश्‍वत पर्याय उपलब्ध करणार

- नवी विमानतळांची पूर्णतः पर्यावरणपूरक उभारणी

- उडान योजनेमुळे सर्वसामान्यांनाही विमानसेवा उपलब्ध

- डीजी यात्रा सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि सहज

Tendernama
www.tendernama.com