Mumbai : गिरणी कामगारांना सरकारने काय दिली Good News? टेंडरही निघाले; वाचा सविस्तर

Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्याच्या गृहनिर्माण विभागाने गिरणी कामगारांना आणि वारसांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी, पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप - PPP) आणि जेव्ही (जॉइंट व्हेंचर - JV) धोरणाअंतर्गत बिल्डरची निवड करण्यासाठी टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. या टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विकासकांकडे किमान ३० एकर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक घराची किंमत १५ लाख रुपये असावी, अशी अट घालण्यात आली आहे.

Mantralaya
बापरे, शालेय शिक्षण खात्यात बदल्यांचे टेंडर फुटले! कोट्टीच्या कोट्टी उड्डाणे

मुंबईतील बंद गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांना घरे देण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र मुंबईत जमिनी अभावी गिरणी कामगार आणि वारसांना घरे उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे. यातच गिरणी कामगार संघटनांनी मुंबईतच घरे उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र जमीन उपलब्ध नसल्याने गिरणी कामगार आणि वारसांना खासगी विकासकांमार्फत घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे.

Mantralaya
Vijay Wadettiwar : मतांसाठी 'लाडक्या बहिणी'ला 1500 रुपये तर 'लाडक्या मंत्र्या'ला 500 कोटींचा भूखंड!

बंद गिरणीच्या जागेपैकी एक तृतीयांश जागेवर घरे उभारून ती गिरणी कामगार आणि वारसांना देण्यात येत आहेत. म्हाडामार्फत गिरण्यांच्या जागेवर घरे उभारून त्याचे वितरण पात्र गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना करण्यात येत आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे १ लाख कामगार पात्र ठरले आहेत. त्यांना घरे देण्यासाठी म्हाडा आणि गृहनिर्माण विभाग प्रयत्नशील आहे.

Mantralaya
Tendernama Exclusive : मंत्री संजय राठोड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! हेराफेरी करून हडपला 500 कोटींचा भूखंड

गिरणी कामगारांना स्वस्त घर देण्यासाठी गृहनिर्माण विभागाने खासगी विकासकांना पीपीपी आणि जेव्ही योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्याबाबत टेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विकासकांकडे किमान ३० एकर जमीन असणे आवश्यक आहे. यासह प्रत्येक घराची किंमत १५ लाख रुपये असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे.

या अटींची पूर्तता करणारे विकासक या प्रकल्पासाठी पात्र ठरतील. गिरणी कामगारांसाठी दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा गृहनिर्माण विभागाचा उद्देश आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com