Mumbai To Shrivardhan : कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! मुंबई ते श्रीवर्धन अवघ्या अडीच तासांत

Mumbai To Shrivardhan Ro Ro
Mumbai To Shrivardhan Ro RoTendernama
Published on

Mumbai To Shrivardhan News मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा रो रो जलसेवेच्या (Bhaucha Dhakka To Mandva Ro Ro) धर्तीवर मुरुड (Murud) आणि श्रीवर्धन (Shrivardhan) तालुक्यांना जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. Konkan Tourism News

Mumbai To Shrivardhan Ro Ro
Pune Airport News : पुणे विमानतळावर पोहचायला प्रवाशांना का होतोय उशीर?

Sagarmala Project सागरमाला योजने अंतर्गत भाऊचा धक्का ते श्रीवर्धन तालुक्यातील दिघीपर्यंत रोरो सेवेचा विस्तार केला जाणार आहे. दिघी येथे जेटी बांधकामासाठी ८८ कोटींचा खर्च अपेक्षित असून लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. अवघ्या अडीच ते तीन तासांतच मुंबईतून श्रीवर्धनपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासाला ५ ते ६ तास लागतात.

चार वर्षापूर्वी मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडव्या दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात आली होती. या जलप्रवासी वाहतूक सेवेमुळे मुंबईतून अलिबागला येणाऱ्या पर्यटकांना आपली वाहने बोटीतून आणण्याची सुविधा उपलब्ध झाली.

Mumbai To Shrivardhan Ro Ro
Pune Rain News : 1 कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून! दोषी कोण...कंत्राटदार की पाऊस?

भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर अवघ्या ५० मिनटात पार करणे शक्य झाले. यामुळे इंधन आणि वेळेची बचत होण्यास मदत झाली. प्रवाशांचा या सेवेला लाभलेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांना रो रो जलप्रवासी सेवेनी जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सागरमाला योजने अंतर्गत काशिद येथे रो रो जेटी, टर्मिनल, वाहनतळ, ब्रेक वॉटर बंधारा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी ब्रेक वॉटर बंधारा उभारणीचे काम पूर्ण झाले असून, जेटीचे काम पुढील चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

जानेवारी २०२५ पासून या टर्मिनल मधून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुक सुरू करण्याचे नियोजन आहे. या जेटीमुळे मुंबई ते काशिद हे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण होऊ शकणार आहे. यासाठी जवळपास दीडशे कोटींचा निधी खर्च होणार आहे.

Mumbai To Shrivardhan Ro Ro
Mumbai Coastal Road : थरार...मुंबई कोस्टल रोडचा!

काशिद पाठोपाठ आता श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथेही रो रो जेटीचे बांधकाम करण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. यासाठी ८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

या जेटीमुळे मुंबईतून थेट श्रीवर्धन पर्यंत रो रो सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे मुंबई ते श्रीवर्धन पर्यंतचा प्रवास वेळ निम्यावर येणार आहे. अवघ्या अडीच ते तीन तासांत मुंबईतून श्रीवर्धन पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. या रो रो सेवेमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mumbai To Shrivardhan Ro Ro
Satara : वर्षभरात मेडिकल कॉलेजचे स्थलांतर तरीही 'कॅन्टीन’साठी कोट्यवधींच्या खर्चाचा घाट

कोविड काळात काशिद येथील जेटीचे काम रखडले होते. मात्र आता ते मार्गी लागले आहे. ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. जेटीची व वाहनतळाची उर्वरीत कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जातील. पुढील वर्षापासून काशिदपर्यंत रो रो सेवा सुरू करता येऊ शकते. दिघी येथील जेटीचे कामही लवकरच सुरू होईल.
- सुधीर देवरे, मुख्य कार्यकारी अभियंता, मेरीटाईम बोर्ड 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com