मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या काही मिनिटांत करा पार..

shivadi nhavasheva project

shivadi nhavasheva project

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई (Mumbai) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) दरम्यानचे अंतर शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून (मुंबई पारबंदर प्रकल्प Mumbai Parbandar Project) मेट्रोद्वारे (Metro) काही मिनिटांत पार करण्याचे प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे महिन्याभरात स्पष्ट होणार आहे.

shivadi nhavasheva project

पोलिस दलात खासगी सॉफ्टवेअरला रेड कार्पेट; महाराष्ट्रात 'वसुली'?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सागरी सेतूवरून मेट्रो नेण्यासाठी मेट्रो १९ (प्रभादेवी - शिवडी - नवी मुंबई विमानतळ) मार्गिकेची आखणी (एमएमआरडीए) केली आहे. या मार्गिकेचा व्यवहार्यता अभ्यास अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालावर मेट्रो-१९चे भवितव्य ठरणार आहे.

shivadi nhavasheva project

IMPACT : अखेर पुणे-सातारा महामार्गावरील रिलायन्सचा ठेका रद्द

एकूण २१.८१ किमीच्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे काम सध्या वेगात सुरू असून, सप्टेंबर २०२३ मध्ये हा सेतू वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे २०२३ पासून शिवडीवरून नवी मुंबईला केवळ २५ मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पाचा वापर अधिक व्हावा यासाठी त्यावर मेट्रो मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे.

shivadi nhavasheva project

EXCLUSIVE: मुंबै बँक बोगस कर्ज वाटप; धस, दरेकरांवर गुन्ह्याचे आदेश

सागरी सेतूचे काम सुरू असताना आणि प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार असताना प्रस्तावित मेट्रो मार्गाबाबत कोणतीही कार्यवाही 'एमएमआरडीए'कडून होताना दिसत नव्हती. त्यामुळे सागरी सेतूवरील मेट्रो बारगळल्याचे चित्र होते. मात्र, एमएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक अभ्यास-२ नुसार २०२१ ते २०४१ दरम्यानच्या वाहतूक कोंडीचा विचार करून मेट्रोचे जाळे वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार मेट्रो १९ मार्गिकेचीही शिफारस करण्यात आली आहे.

shivadi nhavasheva project

मुंबईतील बिल्डरांना...; पुनर्रचित इमारतींनाही आता 'इतका' एफएसआय

या शिफारशीनुसार एमएमआरडीएने एका खागसी सल्लागार कंपनीची नियुक्ती करून सागरी सेतूवरील मेट्रो मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे. हा अभ्यास आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच यासंबंधीचा अहवाल एमएमआरडीएकडे सादर होईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. या अहवालावर मेट्रो मार्गिकेचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र हा अहवाल सकारात्मक येईल आणि हा मार्ग मार्गी लागेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

shivadi nhavasheva project

मुंबई महापालिका निवडणूक: अर्ध्या तासात पाच हजार कोटींचा निर्णय

असा आहे प्रकल्प..
- प्रभादेवी-शिवडी-नवी मुंबई विमानतळ मेट्रो १९ ही २६.५ किमीची मेट्रो मार्गिका
- अंदाजे १४,७३० कोटी रुपये खर्च अपेक्षित (५ किमीचा मेट्रो २१ आणि १९ मिळून)
- मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेला मेट्रो १९ जोडणार
- सागरी सेतूवर स्वतंत्र बस मार्गिकाही शिवडीवरून सागरी सेतू मार्गे नवी मुंबई विमानतळपर्यंत मार्गिका पोहोचणार
- व्यवहार्यता अभ्यास अंतिम टप्प्यात महिन्याभरात अहवाल सादर होण्याची शक्यता

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com