Mumbai : मिठी नदीच्या संवर्धनासाठी यंदा 650 कोटींची कामे

Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेमार्फत गेली काही वर्षे सातत्याने मिठी नदी शुद्धीकरण कार्यक्रम राबवला जातो. विविध विकासकामांची मोठी मोहीम हाती घेतली जाते. गेल्या १७ वर्षात मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि संवर्धनावर सुमारे १ हजार १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले; मात्र सांडपाणी आणि रसायनयुक्त पाण्याच्या उत्सर्जनामुळे मिठी स्वच्छ करण्यात प्रशासनाला साफ अपयश आले आहे. मुंबई महानगरपालिकेने आगामी वर्षात मिठीच्या विविध कामांसाठी ६५४ कोटींची तरतूद केली आहे.

Mumbai
BMC: गाळाच्या वजनानुसार ठेकेदारांना मिळणार नालेसफाईचे 180 कोटी

मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. नदीच्या संरक्षक भिंतीचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून मिठी नदीची धारण क्षमता दुप्पटीने आणि वहन क्षमता तीनपटीने वाढल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. आता नव्या अर्थसंकल्पात नदीच्या विकासाचा आणि नदीचा प्रदूषण नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला असून त्याची चार पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मिठी नदीच्या विकासाचे काम ठप्प झाले होते, आता या कामाला वेग देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Mumbai
Mumbai : वर्षभरात हायटेक ससून डॉक; मंत्री मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई महानगरपालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे सूचविली आहेत. सल्लागाराने सूचविलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत फिल्टरपाडा, पवई ते डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून ते मिठी किनाऱ्यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड येथे प्रस्तावित मलशुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित केले होते.

Mumbai
Mumbai : खड्डे भरण्यासाठी यंदा तिप्पट दराचे टेंडर; कोणी केला आरोप?

सल्लागाराने सूचविलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत गट क्र. 2 अंतर्गत, मुख्यतः (भरती प्रवण क्षेत्र वगळता) छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे इत्यादी कामांचा अंतर्भाव आहे.

अशी होणार मिठी नदीच्या विकासाची कामे-
पॅकेज १ - मिठीच्या पवई ते फिल्टर पाड्यापासून इंटरसेफ्टरचे बांधकाम, मलनिसारण वाहिन्या टाकणे, मलजल प्रक्रिया केंद्र - १३३ कोटी
पॅकेज २  - अंतर्गत भिंत, सेवा रस्ता, पवई ते सीएसटी रोड कुर्ला मलनिसारण वाहिन्या टाकणे - ५७०  कोटी
पॅकेज ३  - संरक्षक भिंत, फ्लड गेट, पंपिंग यंत्रणा, पवई ते सीएसटी रोड पूल, कुर्ला, मलनिसारण वाहिन्या - २१५६ कोटी
पॅकेज ४  - बापट नाल्यापासून सफेदपूल नाला ते घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंत बाेगद्याचे बांधकाम - ४५५ कोटी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com