मुंबईत रस्त्यांसाठी 5800 कोटींचे टेंडर; पश्चिम उपनगरासाठी सर्वाधिक

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) शहरातील सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ५ हजार ८०० कोटींची पाच टेंडर प्रसिद्ध केली आहेत. पश्चिम उपनगरांमधील २७५ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ३ हजार ८०१ कोटींचे सर्वाधिक टेंडर आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील ७१ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी १ हजार १९४ कोटी आणि पूर्व उपनगरातील ७० किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ८११ कोटींचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटने बांधले जाणार असून, त्यामुळे दोन वर्षांत संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा महापालिकेचा आहे.

BMC
नितीन गडकरी म्हणतात, आता सॅटेलाईटद्वारे होणार टोलवसुली!

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या मोठ्या कंपन्यांकडून टेंडरला प्रतिसाद मिळेल अशी महापालिकेला अपेक्षा आहे. टेंडरमध्ये संयुक्त भागीदारीला परवानगी नाकारलेली आहे. रस्ते कामांची माहिती देण्यासाठी बॅरिकेडवर क्यूआर कोड असणार आहेत. पदपथांवर दिव्यांग स्नेही पद्धतीने रचना असणार आहे. उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र भूमिगत मार्ग, पावसाचे पाणी मुरण्यासाठी शोषखड्डे, गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थेची नेमणूक आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या तरतुदींचा टेंडरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

BMC
मुंबई मेट्रो-3 साठी 147 कोटी; 'एमआरव्हीसी'ला 600 कोटी

मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ते बांधणी केली जात आहे. आतापर्यंत ९८९.८४ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते सुधारण्याच्या दृष्टीने काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. चालू वर्षात २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम होत आहे. त्यावर २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. आणखी ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. तर उर्वरित ४२३ किलोमीटर लांबीची कामे पुढील वर्षी हाती घेतली जातील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com