मुंबई महापालिकेचे 'डिजिटल स्मार्ट मॅनहोल' पुरवठ्यासाठी टेंडर

Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरात अतिवृष्टीच्या काळात समाजकंटकांकडून मॅनहोलचे झाकण उघडले गेल्यास सायरन वाजून धोक्याचा इशारा देणारे 'डिजिटल स्मार्ट मॅनहोल' मुंबई महापालिका दक्षिण मुंबईतील 14 ठिकाणी बसवणार आहे. शिवाय मॅनहोलच्या ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाल्यास त्याचा अलर्टही महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये मिळणार आहे. 'डिजिटल स्मार्ट मॅनहोल' पुरवठा करण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Mumbai
राज्यातील 'या' 10 जिल्ह्यातील रस्त्यांसाठी आशियाई बँकेशी करार

मुंबई महापालिकेच्या मलनि:स्सारण विभागाअंतर्गत मुंबईत सुमारे 75 हजार मॅनहोल आहेत. या ठिकाणी अतिवृष्टीत पाणी तुंबलेले असल्यास मॅनहोलचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मॅनहोलवर मजबूत संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत. शिवाय या संरक्षक जाळ्या चोरीला जाऊ नयेत यासाठी साखळीने बांधून लॉक करण्यात येतात. तरीही लोखंडी मजबूत जाळ्या समाजकंटकांकडून उखडून विकण्याचे प्रकार घडत असल्यामुळे आता 'डिजिटल स्मार्ट मॅनहोल' बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शिवाय मुंबई शहरासह पूर्व-पश्चिम उपनगरांतील पावसाळ्यात धोकादायक ठरू शकणाऱ्या मॅनहोलचे सर्वेक्षण करून संरक्षक जाळ्या आणि आवश्यक दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याची माहितीही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या डिजिटल स्मार्ट मॅनहोलमुळे रहिवाशांना धोक्याचा इशारा देता येणार असून महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत. यामध्ये चार ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या मॅनहोलमुळे पुराचा धोक्याचा इशाराही मिळणार आहे.

Mumbai
27 एकरवर होणार कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास; 8238 रहिवाशांना घरे

मॅनहोलवरील झाकण काढल्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे दुर्घटना होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे मॅनहोलचे झाकण बेकायदशीरपणे काढल्यास महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मॅनहोलवरील झाकणे स्वतःहून परस्पर काढू नयेत असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मॅनहोलचा पुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत उघड्या मॅनहोलमध्ये पडून प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. यामुळे मुंबईतील उघड्या मॅनहोलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता, तर मुंबई उच्च न्यायालयानेही महापालिकेला मॅनहोल सुरक्षेबाबत काय उपाययोजना करण्यात आल्या अशी विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील 14 ठिकाणी असे डिजिटल स्मार्ट मॅनहोल बसवण्यात येणार आहेत. अतिवृष्टीत मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com