BMC: महापालिकेचे इलेक्ट्रिक वाहनांऐवजी 299 सीएनजी वाहनांसाठी टेंडर

CNG
CNGTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने भाडेतत्त्वावरील सीएनजी वाहनांसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. सात वेगवेगळ्या विभागांसाठी २९९ गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

CNG
Mumbai : 'BKC'तील 3 हजार कोटींच्या भूखंडांसाठी टेंडर

महापालिकेेतील पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प, रस्ते आणि बांधकाम विभाग आणि इतर विभागांना सातत्याने विविध कामांसाठी गाड्यांची गरज असते. या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या वापरासाठी भाडेतत्त्वावर १००० सीसी आणि त्यावरील क्षमतेच्या कोणत्याही प्रवासी परवाना नॉन एसी कारचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात सात वेगवेगळ्या विभागांचा समावेश असून त्यासाठी एकूण २९९ गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांचे मॉडेल जानेवारी २०१८ नंतरचे असावे तसेच गाड्या पांढऱ्या रंगाच्या असाव्यात, असे टेंडरमध्ये म्हटले आहे.

CNG
Mumbai: मुंबईतील मोकळ्या जागा वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे उद्धिष्ट होते. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याऐवजी महापालिका स्वत:च्याच विविध विभागांसाठी सीएनजी गाड्यांसाठी टेंडर मागविण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने एवढ्या मोठ्या संख्येत इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्त्वावर उपलब्ध होत नसल्याने सीएनजीचा पर्याय निवडल्याची माहिती दिली आहे. या आधी वापरासाठीच्या गाड्यांचा भाडेतत्त्वाचा कालावधी हा तीन ते पाच वर्षे इतका होता. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com