Mumbai : हवा शुद्धीकरणासाठी 5 एअर प्युरिफायर; 10 कोटी खर्च

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील वायू प्रदुषणाची समस्या पाहता शहरातील पाच ठिकाणी एअर प्युरिफायर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून १० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही उपकरणे लावण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीची खरेदी प्रक्रिया राबविली जाणार आहे.

BMC
Ashwini Vaishnav: महाराष्ट्रातील 'या' नेत्यामुळे रखडली बुलेट ट्रेन

मुंबईत दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, अमर महाल जंक्शन, वरळी जंक्शन, कलानगर या पाच वाहतूक कोंडी असणाऱ्या ठिकाणी ही प्युरिफायर मशीन लावण्यात येणार आहेत. मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना दिले आहेत.

BMC
Nashik : सिडको-सातपूरला 2055 पर्यंत पाणीपुरवठा करणारी योजना मार्गी

मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावेत असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे. मुंबईतील प्रदुषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजन  करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

BMC
Aurangabad : 'त्या 'उड्डाणपुलाखालील अंडरपास ओलांडताना कोंडी होणारच

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सूचविल्या आहेत. मुंबईतील सुमारे २७ टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी त्यांचा डाटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे येणारा ताण कमी करण्याकरिता बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढविण्याच्या तसेच डायलिसीस केंद्र उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिल्या आहेत.

BMC
Express way : दिल्ली-मुंबई ई-वेच्या पहिल्या टप्प्याचा ठरला मुहूर्त

मुंबईत ५ ठिकाणी लागणाऱ्या एअर प्युरिफायरसाठी १० कोटी रुपयांचा खर्च महापालिकेकडून करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही उपकरणे लावण्यात येणार आहे. मुंबईत दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, अमर महाल जंक्शन, वरळी जंक्शन, कलानगर या पाच वाहतूक कोंडी असणाऱ्या ठिकाणी प्युरिफायर मशीन लावण्यात येणार आहेत. सक्शन पंपच्या सहाय्याने वातावरणातील हवा खेचून शुद्ध हवा बाहेर सोडण्याचे काम या प्युरिफायरच्या उपकरणातून केले जाणे अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com