भ्रष्टाचाराच्या फाईल्ससाठी मुंबई महापालिकेची अडीच कोटींची उधळपट्टी

वर्षानुवर्षे उघड्यावर असलेल्या या फायली आता कडीकुलपात
BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सुमारे ३३ हजार कोटींचा अर्थसंकल्प (Budget), दरवर्षी दहा हजार कोटींहून अधिक खर्चाची विकासकामे असलेल्या मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) भ्रष्टाचार (Corruption) हा देखील स्वतंत्र विषय आहे. त्यापोटी होणाऱ्या चौकशांच्या फायलींचे जतन करण्याचे काम जिकिरीचे आहे. अनेक विभागांत वर्षानुवर्षे उघड्यावर असलेल्या या फायली आता कडीकुलपात बंदिस्त केल्या जाणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची कपाटे (व्हेरिएल सेगमेंट) खरेदी करण्यात आली असून यासाठी महापालिकेने तब्बल अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत.

BMC
फडणवीसांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ची निघणार कुंडली

महापालिकेची २४ विभाग कार्यालये, रुग्णालये, नगर अभियंता खाते आणि इतर महत्त्वाच्या कार्यालयांतील अनियमितता, गैरवर्तणूक आणि गैरव्यवहाराच्या प्रकरणांची चौकशी परिमंडळ कार्यालयाकडून पूर्ण झाल्यानंतर अंतिम कारवाईसाठी सर्व प्रकारच्या खात्यांमधील चौकशी विभागाकडे ती वर्ग करण्यात येतात. चौकशी विभागाकडे असलेला दस्तावेज 'अ' श्रेणीचा असल्याने त्याचे योग्य पद्धतीने जतन करणे आवश्यक आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

BMC
टेंडर निघाले पण कामाचा नारळ कधी फुटणार?

अनेक पालिका कार्यालयात विविध स्वरूपाची कागदपत्रे व फायली वर्षानुवर्षे उघड्या लोखंडी रॅक व कपाटात ठेवली जात आहेत. रॅक आणि कपाटे जुनी व जीर्ण झाल्यामुळे कागदपत्रे व फायली खराब होत आहेत. जागा नसल्याने उघड्यावर ठेवल्याने कागदपत्रांवर वातावरणाचादेखील परिणाम होतो. कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी नवीन यंत्रणेच्या शोध सुरू असताना महापालिका प्रशासनाला ''व्हेरिएल व स्थिर सेगमेंट'' केल्यास कागदपत्रे खराब होणार नसल्याचा नवा पर्याय मिळाला आहे.

BMC
मुंबईत खारे पाणी गोड होणार अन् सल्लागाराला १५० कोटी जाणार

काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयातून तसेच, इमारत प्रस्ताव विभागातून हजारो फायली गहाळ झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. इमारतींसंबंधी नकाशे, आराखडे तसेच कर्मचार्यांच्या चौकशीच्या फायलींचा यात समावेश असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी सुरक्षित कपाटांची आवश्यकता असल्याची मागणी नगरसेवकांनी महापालिका सभागृहात केली होती. त्यानंतर पालिकेने या फायलींचे डिजिटायझेशन सुरू केले.

BMC
नागपुरात ब्लॅकलिस्टेड कंपनीला टेंडर न काढताच दिले ७ कोटींचे काम

आधुनिक पद्धतीच्या कपाटांमुळे फायली जतन करणे व शोधणे सुलभ होत आहे. कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येत आहे. यासाठी चौकशी खाते प्रमुख उपअभियंता (मलनिसारण), शाळा पायाभूत कक्षाच्या विविध कार्यालयांकरिता ही खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com