Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'त्या' 4,657 कोटींमुळे मुंबई मेट्रो-3 ला मोठा बूस्टर

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama
Published on

Mumbai Metro News मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी (Mumbai Metro - 3) केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या सोबत अर्थ सहाय्याकरिता कर्जाच्या पाचव्या व अंतिम टप्प्याच्या वितरणासाठी करार करण्यात आला. यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ४,६५७ कोटी इतका निधी मिळणार असून, प्रकल्प पूर्णत्वाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

Mumbai Metro
Sambhajinagar : अखेर काय आहे शिवाजीनगर भुयारी मार्गाची सद्य:स्थिती; जाणून घ्या अधिकारी काय म्हणाले?

केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक कार्य विभागाच्या अतिरिक्त सचिव मनीषा सिन्हा आणि जपान सरकारच्यावतीने जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी करारावर सह्या केल्या. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेल्या केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार मुंबई मेट्रो मार्ग-३ चा सुधारित प्रकल्प खर्च ३७,२७६ कोटी इतका आहे. यापैकी जायकाचे कर्ज ५७.०९% म्हणजे २१,२८० कोटी इतके आहे.

जायका कर्ज कराराच्या पाचव्या टप्प्याची रक्कम ४६५७ कोटी असून, २०१४ पासून सुरू झालेले निधी वितरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी १७ सप्टेंबर २०१३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती.

Mumbai Metro
Tender Scam : अमरावतीमधील 'तो' ई-टेंडर घोटाळा पोहचला विधीमंडळात; काय म्हणाले अंबादास दानवे?

मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुरुवातीपासून जायकाचे अमूल्य सहकार्य मिळाले आहे, शेवटच्या कर्ज टप्प्याच्या वितरणानंतर प्रकल्पाच्या उर्वरित कामांना नक्कीच गती प्राप्त होईल, असे एमएमआरसीचे नियोजन आणि रिअल-इस्टेट विकास/एनएफबीआर यांचे संचालक आर. रमणा यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com