मुंबई-अहमदाबाद पाठोपाठ 'या' ७११ किमीच्या मार्गावर बुलेट ट्रेनची...

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) या बुलेट ट्रेनपाठोपाठ आणखी एका मार्गावर बुलेट ट्रेन धावण्याची चिन्हे आहेत. मुंबई-हैदराबाद या ७११ किलोमीटर मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबत चाचपणी सुरु आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. मुंबई ते हैदराबाद प्रवासासाठी सध्या १४ तास लागतात; बुलेट ट्रेनने हा प्रवास फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रासह तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या विकासात हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

Bullet Train
अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; पुणे-नाशिक औद्योगिक मार्गाला

प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद आणि हैदराबाद या ११ रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे. ठाणे जिल्ह्यात ९ किमीचा मार्ग असणार आहे. ठाणे जिल्ह्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांत भूसंपादन होणार आहे. ७११ किमीच्या या मार्गावर प्रती तास ३५० किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावेल, असा त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा वेग सरासरी २५० किमी प्रती तास असेल. रूळ स्टँडर्ड गेजचे असणार असून, एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे.

Bullet Train
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पुणेकरांची दिवाळी गोड!

गेल्या वर्षी मे महिन्यात 'मुंबई-पुणे-हैदराबाद' बुलेट ट्रेनसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सुरुवात झाली होती. सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक 'एरियल लिडार' आणि 'इमेजरी सेन्सर'ने बसवलेल्या विमानाने पाहणी करण्यात आली. यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून हा अहवाल नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला (एनएचआरसीएल) सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या बुलेट ट्रेनच्या कामास रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com