'त्या' 3 गावांच्या नावावरुन तिसऱ्या मुंबईचे नामकरण; 'एमएमआरडीए'चा मोठा निर्णय

Infra
InfraTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्यातील १२४ गावांपैकी तीन गावांच्या नावावरून तिसरी मुंबई ओळखली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तिसऱ्या मुंबईला कर्नाळा-साई-चिरनेर न्यू टाऊन (केएससी न्यू टाऊन) असे नाव दिले आहे. नव्या नावामुळे या तीन गावांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Infra
Mumbai : MMR मध्ये गिरणी कामगारांना 81 हजार घरे; ‘त्या’ दोन कंपन्यांना काम

कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्यासाठी कर्नाळा प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटातील हिरवाईने नटलेले साई गाव निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श रिसॉर्ट आहे. भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) जवळ असलेले चिरनेर हे प्रमुख पायाभूत सुविधांमुळे महत्त्वाची भूमिका बजावते. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिसऱ्या मुंबईची घोषणा २०१३ मध्ये करण्यात आली होती. हे शहर ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे असून येथे स्मार्ट सिटीच्या वैशिष्ट्यांसह पर्यावरणपूरक टाऊनशिप वसवली जाणार आहे.

Infra
Mumbai : मुंबईतील 'त्या' 2 मोठ्या रुग्णालयांच्या 3 हजार कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाला Green Signal

'एमएमआरडीए'ची अधिकृतरित्या शहराचे नवीन शहर विकास प्राधिकरण (एनटीडीए) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यावर १५ ऑक्टोबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात तीन अधिसूचना प्रसिद्ध केल्या आहेत. मुंबई ते नवी मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी 'एमएमआरडीए'ने श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक विकसित केला आहे, ज्याचा या भागाच्या आर्थिक विकासावर आणि वाढीवर मोठा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. भारतातील सर्वात लांब २१.८ किमी लांबीचा सी लिंक १७,८४३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात या पुलावरून ७ लाख २५ हजार ७४६ वाहने धावली होती. १२४ गावांपैकी नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील ८०, खोपटा न्यू टाऊन अधिसूचित क्षेत्रातील ३३, मुंबई महानगर प्रादेशिक योजनेतील २ आणि रायगड प्रादेशिक योजनेतील ९ गावांचा समावेश आहे. यापुढे खोपटा न्यू टाऊन अधिसूचित क्षेत्रातील ३३ गावांसाठी शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) विशेष नियोजन प्राधिकरण राहणार नाही. पेण नगरपरिषदेच्या आजूबाजूचा परिसर या यादीतून वगळण्यात आला आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com