Mumbai : 'या' नव्या मार्गामुळे एमएमआर क्षेत्रातील सर्व शहरे महामार्गाशी जोडली जाणार

National Highway
National HighwayTendernama
Published on

कल्याण (Kalyan) : ठाणे शहराच्या बाजूच्या शहरांत वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रीय महामार्ग तीनवरून कल्याण-बदलापूर अशा नियंत्रित- प्रवेश महामार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. या मार्गामुळे एमएमआर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, तसेच नवी मुंबईसारख्या शहरांमधील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

National Highway
Mumbai News : मुंबईत दर्जेदार रस्त्यांसाठी महापालिकेचा चक्रव्यूह; काय आहे नवा प्लान? 

एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रीय महामार्ग तीनवरून कल्याण-बदलापूर असा नियंत्रित-प्रवेश महामार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एक बैठक घेतली. या बैठकीत या मार्गाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्भे-तळोजा-उसाटने आणि खारघर-तुर्भे लिंक रोड) हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजनांबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

National Highway
Mumbai : MMRमध्ये नव्या 'ॲक्सेस कंट्रोल' मार्गाची चाचपणी; मुंबईसह कोठूनही 15 मिनिटात बाहेर पडणे शक्य

राज मार्गातील महत्त्वाचे टप्पे -

- बदलापूर येथून जात असलेल्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे. या मार्गावरून पालेगाव येथे मार्गाला पहिला इंटरचेंज असणार आहे. याद्वारे नागरिकांना अंबरनाथ शहरात, तसेच काटई-बदलापूर मार्गावर जाता येणार आहे. त्यानंतर कल्याण पूर्वेतून हेदुटणे येथे मार्गाला दुसरा इंटरचेंज देण्यात आला आहे. येथून वाहनचालकांना मेट्रो-१२ च्या हेदुटणे स्थानकात जाता येणार आहे, तसेच येथून कल्याण रिंग रोडची कनेक्टिव्हीटी या मार्गावरून असणार आहे. कल्याण-शिळफाटा मार्गावरदेखील येथून जाता येणार आहे.

- शिरढोण येथे मल्टीमोड कॉरिडॉर मार्गाला या मार्गे जाता येणार आहे. या रस्त्याच्या उभारणीचे काम जलद गतीने सुरू आहे. या कॉरिडॉरमुळे थेट पुढे मुंबई पुणे एक्स्प्रेस-वे येथे जाता येणार आहे, तसेच सीटीएस कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे सोपे होणार आहे.

- शिरढोण येथे तिसरा इंटरचेंज असल्याने कल्याण येथील २७ गावे जोडली जाणार आहेत, तर उसाटणे येथून जाणाऱ्या राज्य महामार्गाला जोडण्यात येणार आहे. उसाटणे येथील रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून मुंबई-पनवेल महामार्गाला या मार्गाची जोडणी असल्याने पनवेलपर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे.

- खारघर तुर्भे लिंक रोडला हा मार्ग थेट जोडण्यात येणार आहे. या लिंक रोडची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष उभारणीचे कामदेखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाता येणार आहे.

प्रकल्पाचे फायदे

- संपूर्ण मार्ग ग्रीन फिल्ड असणार.

- बदलापूर येथून मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाद्वारे समृद्धी महामार्गाला जाता येणार.

- मुंबई-आग्रा महामार्गाला जाता येणार असल्याने नाशिकच्या दिशेने प्रवास करता येणार.

- शहराच्या बाहेरून वाहने प्रवास करणार.

- बदलापूर ते डोंबिवली येथील वाहनचालकांना थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठता येणार.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com