Mumbai-Pune Expressway : मिसिंग लिंकअंतर्गत दोन्ही बोगद्यांचे 98 टक्के काम पूर्णत्वास; येत्या 4 महिन्यात...

Missing
Missing
Published on

मुंबई (Mumbai) : एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आला आहे. प्रकल्पाअंतर्गत दोन्ही बोगद्यांचे बहुतांश काम पूर्णत्वास आले आहे. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर इतकी आहे. येत्या ४ महिन्यात मिसिंग लिंक मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

Missing
Mumbai : दक्षिण मुंबईतील रखडलेल्या 'त्या' 7 प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर

मुंबईतून पुण्याला प्रवासात खंडाळा घाटात नेहमीच वाहतूक कोंडी होते. लवकरच या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. नजीकच्या काळात एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आला आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल उभारला जात आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाला आहे. 2025 या वर्षात हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Missing
Mumbai : कोस्टल रोडची प्रतीक्षा संपली; 70 टक्के वेळेची तर 34 टक्के इंधनाची बचत होणार

या मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात येत आहेत. या बोगद्यांचे बहुतांश काम पूर्णत्वास आले आहे. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा असणार आहे. या दोन्ही बोगद्यांची 98 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी झाल्या होत्या. मात्र, हे काम देखील आता प्रगतीपथावर आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रकल्प मानला जातो. सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेड पुल उभारणे हे मोठे आव्हानात्मक अभियांत्रिकी काम आहे.

Missing
Mumbai : स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनसबाबत आली मोठी बातमी; आता...

14 किलोमीटर असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. फक्त लोणावळ्यात प्रवेश करण्यासाठी या खंडाळा घाटातून जावे लागेल. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डिसेंबर 2024 हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. यामुळे आता या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 मिनीटांचा वेळ वाचणार आहे. भविष्यात एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याचा प्रवास आणखी जलद होणार आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com