समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार खुला; एकनाथ शिंदेची माहिती

Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) नागपूरपासून गोंदिया, गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी टेंडर मागविण्यात आल्या असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

Samruddhi Mahamarg
मुंबई-गोवा सुसाट...; आता थेट सिंधुदुर्गापर्यंत पर्यायी मार्ग

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा आत्राम समृद्धी महामार्गाच्या विस्ताराबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर ते मुंबई दरम्यान ७०१ किलोमीटर लांबीच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे १६ बांधकाम पॅकेज अंतर्गत काम प्रगतीपथावर आहे. टेंडर कालावधीनुसार हा महामार्ग सप्टेंबर २०२२ पर्यंत जनतेसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

Samruddhi Mahamarg
राधेश्याम मोपलवारांची खरी 'समृद्धी'; सहाव्यांदा मुदतवाढ

गोंदिया, गडचिरोली या आदिवासी तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या विकासासाठी या भागात दळणवळण अधिक गतिमान झाले पाहिजे. यासाठी समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदियापर्यंत तसेच नागपूरपासून गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. सोबतच गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांनादेखील या महामार्गाने आपापसात जोडण्याचा प्रस्ताव असून विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी टेंडर मागविण्यात आली आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

Samruddhi Mahamarg
बापरे! समृद्धी महामार्गावर कारसाठी भरावा लागेल एवढा टोल?

या टेंडरमध्ये सुसाध्यता आणि व्यवहार्यता अहवाल, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि टेंडरपूर्व कामांचा समावेश आहे. नागपूर ते गोंदिया, गोंदिया ते गडचिरोली आणि गडचिरोली ते नागपूर या कामांचा या टेंडरमध्ये समावेश असून या तीनही महामार्गांची सरासरी लांबी अंदाजे १५० किलोमीटर असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com