'महारेरा'चा दणका; मुंबईतील बिल्डरकडून ग्राहकाला 6 कोटींची भरपाई

Maharera
MahareraTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महारेराने आतापर्यंत ६२३.३० कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी १०१५ वॉरंटस जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत १८० वॉरंटसपोटी १३१.३२ कोटींची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. नुकतीच मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुण्यातील ५ बिल्डरांनी ८ कोटी ७२ लाख रूपयांची भरपाई अदा केलेली आहे. यात मुंबईतील वंडरव्हॅल्यू रिऍलिटी प्रा. लि. या बिल्डरने एका ग्राहकाला सर्वाधिक ६ कोटी २६ लाख रुपये भरपाई दिली आहे.

Maharera
मुंबई मेट्रो स्थानकात गळतीमुळे बादल्या ठेवण्याची वेळ; बांधकामाच...

महारेराने ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी केलेले वॉरंटस वसूल व्हावेत, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे. महारेराच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित विकासकांच्या मिळकती जप्त करून लिलावांच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. आपली मिळकत  जप्त होऊ नये यासाठी आणखी  काही ठिकाणी विकासक पुढे येऊन या नुकसान भरपाईच्या रकमा भरत आहेत किंवा संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसान भरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत.

Maharera
मुंबई उपनगर डीपीडीसीसाठी 976 कोटी; झोपडपट्टीतील सोयी सुविधांवर भर

या पद्धतीने ९ नोटीशी बजावत मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे या भागांतील ५ विकासकांनी ८ कोटी ७२ लाख ७१ हजार रूपयांची नुकसान भरपाई अदा केलेली आहे. यापूर्वी ११ विकासकांनी २० वॉरंटसपोटी ८.५७ कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईची देणीही अशीच कुठल्याही लिलावाशिवाय अदा केलेली आहे. महारेराने आतापर्यंत ६२३.३० कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी १०१५ वॉरंटस जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत १८० वॉरंटसपोटी १३१.३२ कोटींची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. उर्वरित रक्कमही वसूल व्हावी यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे. ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या त्यात मुंबई शहरातील समृद्धी डेव्हलपर्स आणि वंडरव्हॅल्यू रिऍलिटी प्रा. लि. या २ विकासकांचा समावेश आहे. या विकासकांनी ६.४६ कोटी रूपयांची भरपाई दिली असून यातील वंडरव्हॅल्यू विकासकाने एका ग्राहकाला तब्बल ६ कोटी २६ लाखाची भरपाई दिली आहे.

Maharera
Mumbai Metro-12 : 'MMRDA'ने काढले 'या' कामांसाठी टेंडर

मुंबई उपनगरातही रिलायन्स एंटरप्रायझेस आणि रूची प्रिया डेव्हलपर्स प्रा. लि. या २ विकासकांनी १ कोटी ८४ लाख ४६ हजार रूपयांची नुकसान भरपाई दिली आहे. यात रिलायन्सने एका ग्राहकाला नुकसान भरपाईपोटी दिलेली रक्कम १ कोटी ७८ लाख एवढी आहे. पुण्यातील दरोडे जोग होम्स प्रा.लि. यांनीही त्यांच्या एका ग्राहकाला ४२ लाख २५ हजार रूपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे. महारेराने वेळोवेळी सुनावणी घेऊन व्याज/ नुकसान भरपाई/परतावा देण्याबाबत दिलेल्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी महारेरा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. तसेच ही विशिष्ट नियंत्रण यंत्रणा अधिकाधिक बळकट आणि सक्षम करण्यासाठी महारेरा कटीबद्ध आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com