खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटीने घेतला मोठा निर्णय

ST Mahamandal
ST MahamandalTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी पुन्हा एकदा एसी (वातानुकुलित) स्लीपर सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. हैदराबाद येथे आयोजित देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या प्रदर्शनात बस उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांच्या आरामदायी स्लीपर एसी बसही होत्या. साडेतेरा मीटर लांबीच्या स्लीपर बसला महामंडळाची पसंती असल्याचे समजते.

ST Mahamandal
कंत्राटदारावर का भडकले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर; थेट कानशिलात

यापूर्वी एसटी महामंडळाने हा प्रयोग राबविला होता. पण भाडे अधिक असल्याने प्रवाशांनी ही सेवा नाकारली होती. त्यानंतर महामंडळाने भाड्यात कपात करत प्रवाशांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात एसटीला काही यश आले नाही. आता खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या एसी स्लीपर बस प्रवाशांच्या सेवेत सुरु करण्याच्यादृष्टीने चाचपणी सुरु केली आहे.

ST Mahamandal
एसटी महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय; आता तिकीटासाठी येणार...

राज्यात प्रवासी टप्पा वाहतुकीची परवानगी फक्त एसटी महामंडळाला आहे. तरीदेखील राज्यात खासगी ट्रॅव्हल्सची वाहतुक जोमात सुरु आहे. 22 जानेवारी 2018 रोजी परिवहन महामंडळाने एसी स्लीपर शिवशाही बसची सेवा सुरु केली होती. मुंबई मध्यवर्ती बसस्थानकातून ही सेवा सुरु करण्यात आली होती. परंतु याबसचे तिकिट दर जास्त असल्याने प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली. त्यानंतर महामंडळाने 9 फेब्रुवारी 2019 रोजी तिकिट दरात कपात केली. तरी सुद्धा प्रवाशांनी या बसला प्रतिसाद दिला नाही. परिणामी महामंडळाने ही बससेवा बंद केली. त्यानंतर महामंडळाने नोव्हेंबर 2019 मध्ये एकाच बसमध्ये स्लीपर व आसन सुविधा असलेली साधी बस ताफ्यात दाखल केली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात अशा प्रकराच्या 216 स्वमालकीच्या बस आहेत. त्यांना प्रवाशांनी अल्प का असेना प्रतिसाद दिला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com