मंत्र्यांचे बंगले, दालनांच्या सुशोभीकरणावर १०० कोटींचा खर्च?

Mantralay
MantralayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यात सत्तांतर होऊन नवे सरकार सत्तेत येताच मंत्रिमंडळातील सहभागी मंत्र्यांचे बंगले आणि दालन यांच्या सुशोभीकरणावर १०० कोटींचा खर्च करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा सध्या मंत्रालयात सुरु आहे. विशेष म्हणजे, यातील काही मंत्र्याची दालने, बंगले यांची एक वर्षांपूर्वीच दुरूस्ती, रंगरंगोटी झाली आहे. असे असतानाही नव्या मंत्र्यांनी या दालनांची, बंगल्याची दुरुस्तीकामे काढली आहेत. खास बाब म्हणून टेंडर न काढताच ही कामे करण्यात येत असल्यामुळे कोटीच्या कोटी बिले आकारली जात आहेत. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार स्वतः ची चांदी करुन घेत आहेत.

Mantralay
शिंदे सरकारची १ लाख कोटींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष सत्तेत होते. त्या सरकारमधील मंत्र्यांनी बंगले आणि दालनांचे सुशोभीकरण केले. अनेक मंत्र्याच्या दालनाची कामे महिनोंमहिने सुरू होती. या मंत्र्यांच्या बंगले आणि दालनावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. शिवसेना मंत्र्यांच्या दालनात, बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या छबी लावण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस मंत्र्याच्या दालनात शरद पवार, घड्याळ तर काँग्रेस मंत्र्यांच्या दालनात सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचा पंजा यांच्या छबी होत्या.

Mantralay
नाशिक-मुंबई प्रवासाला का लागताहेत 5 तास? NHAIकडून तारीख पे तारीख..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड केले. एकूण ९ मंत्र्यांसह एकूण ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. भाजपसोबत हातमिळवणी करत शिंदे यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. तर महिन्याभरानंतर १८ जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला. या मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यातील काही मंत्र्याची दालने, बंगले यांची एक वर्षांपूर्वीच दुरूस्ती, रंगरंगोटी झाली आहे. असे असतानाही नव्या मंत्र्यांनी या दालनांची, बंगल्याची दुरुस्तीकामे काढली आहेत. मंजुरी मिळण्याआधीच अनेक कामे सुरू केली आहेत. अनेक कामांची टेंडर सुद्धा काढण्यात आलेली नाहीत. भाजप मंत्र्याच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान झाले आहेत. तर शिंदे गटाच्या मंत्राच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा झळकत आहेत.

Mantralay
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी २५० कोटींचे टेंडर; बीएमसी येथे...

मंत्र्यांचा दालनात खुर्ची, सोफा यांची दिशा, फोटोंची जागा, शौचालयाचे दरवाजे, किचन यांची रचना वास्तुशास्त्रानुसार केली जात आहे. मंत्र्याच्या दालनात महागड्या आरामदायी खुर्च्या, सागवानी लाकडाचे फर्निचर, चकचकीत आणि तुळतुळीत लाद्या, गालिचे, छोट्या छोट्या आकर्षक वस्तू याची उधळण सुरु आहे. यात पीडब्ल्यूडी अधिकारी आणि कंत्राटदार यांचे उखळ पांढरे होत आहे. टेंडर न काढता ही कामे करण्यात येत असल्यामुळे कोटीच्या कोटी बिले आकारली जात आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com