मुंबई-गोवा सुसाट...; आता थेट सिंधुदुर्गापर्यंत पर्यायी मार्ग

Mumbai-Goa Highway

Mumbai-Goa Highway

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गाला (Mumbai-Goa Highway) पर्याय ठरणारा आणि कोकणाच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या बहुचर्चित रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतचा सागरी महामार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे.

Mumbai-Goa Highway

राधेश्याम मोपलवारांची खरी 'समृद्धी'; सहाव्यांदा मुदतवाढ

विशेष म्हणजे या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यात आले आहे. 498 किमीच्या या महामार्गाच्या बांधकामासाठी 10 हजार कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. 16 मार्च रोजी या निर्णयाला अंतिम मान्यता मिळाली असून तो चार पॅकेजमध्ये बांधण्यात येणार आहे.

Mumbai-Goa Highway

सी-लिंक टू पुणे सुपरफास्ट; 'इतक्या' कोटींचे टेंडर लवकरच

हा महामार्ग समुद्र किनाऱ्याजवळून जाणार आहे. यामुळे याचा फायदा येथील पर्यटनास होणार आहे. या महामार्गामुळे कोकणाचा जलदगती विकास देखील होणार असल्याचे बोलले जात आहे. कोकणातील प्रसिध्द आंबे, काजू, नारळ, सुपारी यांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. यामुळेच हा होणारा महामार्ग कोकणवायींसाठी फक्त महामार्ग नसून सोन्याचा रस्ताच आहे, असे म्हणता येईल. विशेष म्हणजे रेवस ते रेड्डी मार्गावरील केळसी खाडीवरील पुलासाठी 148 कोटी जवळपास खर्च मंजूर करण्यात आला आहे.

Mumbai-Goa Highway

पुणे-नाशिक रस्त्याबाबत मोठा निर्णय; आता नाशिक फाटा ते राजगुरुनगर..

महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. मात्र, मुंबईकरांना गोव्याला जाण्यासाठी या महामार्गाचा फायदा होणार आहे. हे आहेत महामार्गाचे टप्पे, द्रोणागिरी ते मुरूड 80 किलो मीटर, मुरूड ते बाणकोट 64 किलो मीटर, बाणकोट ते रत्नागिरी 146 किलो मीटर, रत्नागिरी ते पावस 20 किलो मीटर, पावस ते खाक्षीतिठा 69 किलो मीटर, खाक्षीतिठा ते मालवण 50 किलो मीटर, मालवण ते गोवा 65 किलो मीटर. यादरम्यान महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास दहा हजार कोटींचा खर्च येणार आहे. रेवस-रेडी महामार्गाची कल्पना दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी मांडली होती. त्यानंतर काही प्रमाणात या कामाला गतीही आली होती; मात्र निधीअभावी हा प्रकल्प रखडला होता.

Mumbai-Goa Highway

पुणे, पिंपरीच्या वाहतूक प्रश्नावर अजितदादांचा रामबाण उपाय

मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरू शकेल असा हा सागरी महामार्ग आहे. या संकल्पनेतून महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. रेवस ते रेड्डी यादरम्यान हा सागरी महामार्ग तयार केला जाणार आहे. त्यातून किनाऱ्यालगतची शहरे मुख्य रस्त्याशी जोडली जाणार आहेत; तर मुंबई ते गोवा हे अंतरही कमी होणार आहे. हा सर्व मार्ग समुद्र किनाऱ्यालगत निसर्गाच्या सान्निध्यातून जात असल्याने पर्यटकांच्या पसंतीस उतरणारा आहे. कोकणातील नागरिकांना सागरी महामार्ग हा आपुलकीचा विषय आहे. यामुळे येथील पर्यटन, मासेमारी उद्योगालाही चालना मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com