राममंदिराआधीच 'मुंबई ट्रान्स हार्बर'च्या लोकार्पणाचा मुहूर्त? तारिख ठरली पण मोदींची प्रतीक्षा...

MTHL MODI
MTHL MODITendernama
Published on

मुंबई (Mumbai) : देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर म्हणजेच शिवडी ते न्हावा-शेवा सी-लिंकचा लोकार्पण सोहळा १२ जानेवारीला करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे उद्‌घाटन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

MTHL MODI
धारावी पुर्नविकासाचे 'या' प्रख्यात जागतिक कंपन्या करणार नियोजन; सिंगापूरच्या तज्ज्ञांचाही सहभाग

तिसऱ्या महामुंबईला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) निर्माण केला जाणारा एमटीएचएल हा शिवडी-न्हावा चिर्ले २१.८ किलोमीटर लांबीचा सर्वात लांब सागरी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शिवडी ते न्हावा-शेवा सागरी सेतूची नागरिकांना प्रतीक्षा आहे. या प्रकल्पाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. याचवेळी खारकोपर-उरण रेल्वेचेही उद्‌घाटन होणार आहे. नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्प बेलापूर-पेंधरचेही उद्‌घाटन केले जाणार आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आहेत. नाशिकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना मुंबईत आमंत्रित करून पुलाचे लोकार्पण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

MTHL MODI
Mumbai : बीएमसी रुग्णालयांना टेट्रा पॅक दूध पुरवठा; 43 कोटींचे टेंडर

या पुलामुळे मुंबईतून रायगड जिह्यात वीस मिनिटांत पोहोचता येईल. सध्या हे अंतर पार करण्यासाठी किमान दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. या पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची योजना आहे. त्यामुळे पुलाचे लोकार्पण रखडले आहे. 'एमटीएचएल' पुलामुळे मुंबई, नवी मुंबई आणि नवी मुंबईचा नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडला जाणार आहे. यामुळे वेळ व इंधनात मोठी बचत होणार आहे. परिणामी या पुलावर 500 रुपये टोल आकारण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने सादर केल्याचे समजते. टोलच्या रकमेला विरोध होण्याची शक्यता आहे.

स्वामी विवेकानंद यांचा 12 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत. त्याच कार्यक्रमाला जोडून 'एमटीएचएल'चे उद्घाटन करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पंतप्रधान मोदींसह सर्व नेते अयोध्येत राममंदिराच्या कार्यक्रमात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच 'एमटीएचएल'चे लोकार्पण करून घेण्याचा प्रयत्न आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com