टेंडर प्रक्रियेतील विलंबामुळे यंत्रणाच झाली खिळखिळी

सोयी-सुविधांवर पडतोय ताण
टेंडर प्रक्रियेतील विलंबामुळे यंत्रणाच झाली खिळखिळी
Published on

कोल्हापूर महापालिकेच्या वर्कशॉपच्या भरवशावर संपूर्ण शहराची यंत्रणा सुरळित सुरू राहते. मात्र, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे महापालिकेचा वर्कशॉप विभागच खिळखिळा झाला आहे. वेळेवर निविदा प्रक्रिया राबविल्या जात नसल्याने आणि लॉकडाऊनमुळे विभागात स्पेअर पार्ट उपलब्ध नाही. आश्चर्याची बाब म्हणजे वर्कशॉपमध्ये साधा एक स्क्रू देखील मिळणे कठीण झाले आहे, अनेक वाहने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत पडून असल्याने शहरातील सोयी-सुविधांवर ताण पडत आहे.

सुभाष स्टोअर्सचा वर्कशॉप म्हणजे महापालिकेचे नाक आहे. शहरातील सर्व प्रकारच्या आरोग्य, पाणीपुरवठा सुविधा व्यवस्थित चालायच्या असतील तर वर्कशॉप चांगले असायला हवे. पण नेमका उलटा प्रकार महापालिकेच्या वर्कशॉपबाबत घडत आहे. लॉकडॉऊनमुळे वर्कशॉपमध्ये अनेक स्पेअर पार्ट्स उपलब्ध नाहीत. महापालिका ज्या कंपन्यांकडून हे पार्टस खरेदी करते, त्या कंपन्यादेखील लॉकडाऊन काळात बंद होत्या. अनेक वाहनांचे टायर खराब झाले आहे, पण टायर्स देखील वेळेवर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी महापालिकेच्या वर्कशॉप विभागाचे नियोजन पूर्णपणे विस्कटले आहे.

टेंडर प्रक्रियेतील विलंबामुळे यंत्रणाच झाली खिळखिळी
टेंडर घोटाळा 100 कोटींचा; शिक्षा दीड हजारांची

महापालिकेने काही स्थानिक कंपन्यांकडे टेलरद्वारे स्पेअर पार्ट मिळण्याची सुविधा केली आहे. पण या निविदांची मुदत संपली आहे. मुदत संपण्यापूर्वी निविदा प्रक्रिया राबविली नसल्यामुळे आता ऐनवेळी स्पेअर पार्ट आणायचे कुठून, असा प्रश्न वर्कशॉप मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पडला आहे. वाहन दुरुस्तीसाठी एखादा स्क्रू देखील मुश्कील होऊन बसले आहे. परिणामी नागरी सुविधांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

शववाहिकाही बंद पडल्या
कोरोनाची परिस्थिती भयानक असताना आणि मृत्यू दराचे प्रमाण कमी-जास्त असताना महापालिकेच्या ताब्यातील तीन शववाहिका आठवड्यात बंद पडल्या होत्या. स्पेअर पार्टअभावी या शववाहिका दुरुस्त व्हायला देखील बराच वेळ लागला. त्यामुळे या अत्यावश्यक सेवेचा वर्कशॉपच्या अनागोंदी कारभारामुळे खोळंबा झाला.

टेंडर प्रक्रियेतील विलंबामुळे यंत्रणाच झाली खिळखिळी
चणकापूर आश्रमशाळा बांधण्यासाठी निघणार ‘टेंडर'

भोंगळ कारभार
एखाद्या निविदेची मुदत संपत आली असताना दुसरी निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी. निविदेची मुदत संपेपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्या-त्या विभागाच्या प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने वेळेत प्रस्ताव पाठवून वेळेतच निविदा प्रसिद्ध करायला हव्यात. त्यातून वर्कशॉप प्रशासनाच्या नियोजनाचा भोंगळ कारभार स्पष्ट होत आहे.

टेंडर प्रक्रियेतील विलंबामुळे यंत्रणाच झाली खिळखिळी
मालेगाव : रुग्णालयांच्या निविदा प्रसिद्धीपूर्वीच वादात

केवळ एकाच वाहनावर डोलारा
महापालिकेच्या वर्कशॉप विभागाकडे कचरा संकलनासाठी आरसी वाहने काही वर्षांपूर्वी खरेदी केली होती. ही सर्व वाहने देखभाल आणि दुरुस्ती अभावी बंद पडली आहेत. एकूण बारा वाहन खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी आता केवळ एकच वाहन सुरू आहे. या वाहनांच्या देखभाल दुरुस्तीवर मोठा खर्च झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com