कोल्हापूर : टेंडर मंजूर नसताना चॅनेलचे काम केल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. आता काम निम्म्यावर दूसऱ्या बाजूला टेंडर प्रक्रियाही सुरू असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधितांना नोटिस पाठवून खुलासा मागण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे.
नागाळा पार्क परिसरातील कामाचे अंदाजपत्रक सुमारे २४ लाख इतके आहे. पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरू नये असा हेतू कामामागे असला तरी टेंडर मंजूर नसताना काम सुरू झाले त्याचा धक्का अनेकांना बसला. महापालिकेतील भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांच्या यासंबंधी तक्रार प्रशासकांकडे केली होती. कोल्हापूर महापालिकेचे काम आणि टक्केवारी जुने नाते आहे. ठेकेदारांच्या ग्रुपवर अठरा टक्के कमिशनचा मेसेज व्हायरल झाला. त्यातून टक्केवारीचे गणित कसे मांडले जाते हे पुढे आले. ठराविक ठेकेदारानांचा काम कसे मिळतात याचा उलघडा होत गेला.
अजित ठाणेकर तसेच भाजप पदाधिकाऱ्यांना कामासंबंधी नुसती तक्रार न करता एक दिवसाचे उपोषण केले. नंतर प्रशासनाने चौकशी सुरू केला आहे. संबंधिताना नोटिसा लागू झाल्या आहेत. महापालिकेत अतीतातडीच्या कामासाठी आयुक्तांची परवानगी लागते. अन्य कामासाठी टेंडर मागवूनच कामे सुरू करावी लागतात. नागाळा पार्कमधील कामासाठी पाच जणांनी टेंडर भरली होती. टेंडर उघडून हे काम महापालिकेला परवडणारे आहे की नाही याची खातरजमा झाली नाही. कामास प्रारंभ झाला आणि नंतर मंजुरी नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
नागाळा पार्कमधील चॅनेलचे काम निमित्त मात्र उदाहरण आहे. ठाणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रार केली म्हणून किमान चौकशी तरी झाली. अन्यथा काम पूर्ण होऊन ठेकेदाराला बिलही मिळाले असते. ॲडव्हान्समध्ये काम करण्याची येथे पद्धत आहे. महापालिकेचे बिल मिळेल तेव्हा मिळेल गटारी, रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण अशी काम ॲडव्हान्समध्ये केली जातात. एखाद्या ठिकाणी अचानक ड्रेनेज तुंबले त्यासाठी तातडीच्या निधीची गरज लागल्यास आयुक्त परवानगी देऊ शकतात. काळाच्या ओघात टेंडरचा प्रवास ई-टेंडरच्या दिशेने झाला. मात्र त्यातील पळवाटा काही बंद झाल्या नसल्याचा नागाळा पार्कमधील कामावरून स्पष्ट होते.